You are currently viewing चहाच्या कपापासून गणपती बाप्पासाठी आरास….

चहाच्या कपापासून गणपती बाप्पासाठी आरास….

सध्या गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र असून गणपतीच्या सजावटीसाठी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या संकल्पना असतात. त्यात वैविध्य नावीन्य आणण्याचा प्रयत्न असतो. त्यात दिवसें दिवस वाढत जाणारी महागाई, जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढल्याने दुसरेकडे कोरोनाचा प्रादुर्भाव अशा दुहेरी पेचामध्ये सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. परंतु येणारा सण साजरा करावा लागतो. त्याप्रमाणे वाढत्या महागाईचा फटका या वर्षी गणपती सणाला देखील बसला आहे. सर्व वस्तूचे भाव अवाच्या सव्वा झाले आहेत. त्यातच महागाईचा भस्मसुर व कोरोनामुळे मोठी भर पडली आहे. त्यामुळे थोडया बजेटमध्ये सण कसे साजरे करायचे असा प्रश्न मध्यमवर्गींयांना पडला आहे.

या वर्षी यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत आहे. अशा प्रकारे विक्रमगड तालुक्यातील ओंदे येथील रोशन सांबरे यांच्या कुटुंबीयांनी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साधनाचा उपयोग करून आकर्षक मखर तयार केला आहे. महागाईच्या काळात चहाच्या कपा पासून 500-600 रुपयाच्या खर्चांपर्यंत आकर्षक गणपती मखर तयार करून त्या मध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली आहे.

घरातील चहाचे कप एकावर एक रचून केवळ 3-4 तासात आकर्षक मखर तयार केला आहे. हा मखर अत्यंत कल्पकतेमधून तयार करण्यात आला आहे. या सांबरे कुटुंबीयांच्या गणेशोत्सवाला पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, संत तुकाराम महाराज सामाजिक विकास परिषदेचे कार्याध्यक्ष व्ही.जी.पाटील, जिजाऊ संघटनेच्या महिलां सक्षमीकरणाच्या पालघर जिल्हा अध्यक्षा हेमांगीताई पाटील भेट देऊन या महागाईच्या काळात कमी खर्चात आकर्षक मखर साकारल्याने स्तुती केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा