You are currently viewing आरवली श्री देव वेतोबाचा जत्रोत्सव उद्या

आरवली श्री देव वेतोबाचा जत्रोत्सव उद्या

आरवली श्री देव वेतोबाचा जत्रोत्सव उद्या

वेंगुर्ले

दक्षिण कोकणचा तिरुपती आणि भक्तांच्या हाकेला धावणारा अशी ओळख असलेले आरवली गावचे ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री देव वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव मार्ग शिष्य शुद्ध प्रतिपदा शके १९४५ बुधवार १३ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमाने साजरा होणार आहे. सकाळी सालंकृत पाद्य पूजा, वेतोबा दर्शन, नवस फेड, दुपारी महाप्रसाद, सकाळपासून देवाला केळी ठेवणे, नवस बोलणे, नवस फेडणे, रात्री टाळ मृदुंगाच्या गजरात व दारू सामानाच्या आतषबाजीत श्रींची पालखी प्रदक्षिणा होणार आहे. त्यानंतर रात्र नाईक मोचेमाडकर नाट्य मंडळाचे दशावतारी नाटक होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार 14 डिसेंबर रोजी श्रीदेवी सातेरीचा जत्रोत्सव होणार आहे. त्याच दिवशी श्री देव वेतोबाकडे नवसाचे तुलाभार व गुणीजन गौरव कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहून श्रीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी, मानकरी मंडळी, ग्रामस्थ व श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी आरवली यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − seven =