You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयात ७५ वा जागतिक मानवी हक्क दिन साजरा.

वैभववाडी महाविद्यालयात ७५ वा जागतिक मानवी हक्क दिन साजरा.

वैभववाडी महाविद्यालयात ७५ वा जागतिक मानवी हक्क दिन साजरा.

वैभववाडी

१० डिसेंबर हा दिवस जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील सामाजिक शास्त्रे विभागाच्यावतीने ७५ वा जागतिक मानवी हक्क दिन कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .सी.एस.काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. मानवी हक्कांचे स्वरूप आणि व्याप्ती खूप मोठी आहे. १० डिसेंबर,१९४८ रोजी युनोने मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा प्रसिद्ध केला. तेव्हा पासून मानवी हक्काची चळवळ सुरू झाली. मानवी हक्क आणि राज्यघटनेने दिलेले हक्क यांची जाणीव ठेवून प्रत्येकाने आचरण केले पाहिजे. तसेच मानवी हक्काबाबत समाजामध्ये जनजागृती केली पाहिजे असे प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. मानवी हक्काचा इतिहास फार रंजक आहे. राजेशाही संपुष्टात येऊन लोकशाही निर्माण झाली आणि ख-या अर्थाने मानवी हक्काचा विकास सुरू झाला. स्वतःच्या मूलभूत हक्कांचा वापर करीत असताना दुसऱ्याच्या हक्कांवर गदा येणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असे इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस.एन.पाटील यांनी सांगितले. समाजातील गरीब आणि वंचित घटकाला न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि समाज प्रवाहात आणण्यासाठी मानवी हक्क महत्वाची भूमिका बजावतात असे मराठी विभाग प्रमुख डॉ.एन.व्ही.गवळी यांनी सांगितले.
याप्रसंगी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.बी.डी.इंगवले, डॉ संतोष राडे-पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सामाजिक शास्त्रे विभागाचे प्रमुख डॉ. आर.एम.गुलदे यांनी केले. तर आभार प्रा.दिनेश बेटकर यांनी मांडले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा