You are currently viewing युवासेनेच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचा झंझावात

युवासेनेच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचा झंझावात

*युवासेनेच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचा झंझावात*

*फणसगाव येथे संपन्न झाले दुसरे शिबीर; ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद-

देवगड (प्रतिनिधि)

कणकवली विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण तालुक्यात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर असुन, सातत्याने युवासेनेच्या माध्यमातून आंदोलने छेडली गेली होती. माञ चांगली आरोग्य सुविधा आपल्या मतदारसंघातील नागरिकांना मिळावी. या उद्देशाने युवासेना पदाधिकाऱ्यांमार्फत आरोग्य यंत्रणेच्या विरोधात आवाज उठविला होता. आरोग्य विभागा मार्फत ग्रामीण भागांतील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात याव्यात या उद्देशाने युवासेनेच्या माध्यमातून कणकवली विधानसभा मतदारसंघातील ६ ठिकाणी मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात फणस गावातील पंचक्रोशीतून निश्चितपणे उस्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी फणसगाव येथे आयोजित केलेल्या मोफत नेत्रदान तपासणी मोती बिंदू तपासणी व शस्त्रक्रिया उद्घाटनाप्रसंगी बोलताना केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना कणकवली मतदार संघात ६ ठिकाणीं मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज गुरुवारी देवगड तालुक्यातील फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हे शिबीर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याला जिल्हाप्रमुख संदेश पारकर,माजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. छत्रपती शिवाजी महाराज ,हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करून या शिबिराचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात फणसगाव ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद लागला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, माजी सभापती संजय देवरुककर, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश नारकर, फणसगाव शाखा प्रमुख दिलीप ठूकरुल, दिलीप नर, प्रकाश पाटील, कुंभोर्ले सरपंच प्रियंका धावरे, मनोज मेस्त्री, गोपी पेंडूरकर, संतोष केसरकर, रवींद्र मेस्त्री सह अन्य उपस्थित होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर म्हणाले, युवा सेनेच्या माध्यमातून कणकवली मतदार संघामध्ये मोफत मोतीबिंदू तपासणी राबविली जात असून, या शिबिरांत गर्दी पाहून,सर्वसामान्य जनतेपर्यंत आरोग्य यंत्रणा पोचलेली नाहीं. डोळ्या सारख्या गंभीर विषयावर अशा प्रकारची उदासीनता जनतेमध्ये आहे. शासनाची जबाबदारी आहे. ग्रामीण भागांतील जनतेसाठी आरोग्य विषयी शिबिरे भरविणे गरजेचे आहे…!

या प्रसंगी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण करत असताना युवा सेनेच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत.
या शासनाच्याच विविध योजनांचा लाभ मोफत सुविधा मिळवून देण्यासाठी युवासेना प्रयत्नशील आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − one =