*शेतकरी विरोधी राज्य सरकारचा महाविकास आघाडीच्या नेते,आमदारांनी केला निषेध*
*हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवर केले आंदोलन*
*आमदार वैभव नाईक आंदोलनात झाले सहभागी*
वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेत पिकाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शेत मालाला हमीभाव मिळत नाही.कर्जमाफी झालेली नाही,त्याचबरोबर शेत विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून याविरोधात आज महाविकास आघाडीच्या नेते,आमदारांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले व राज्य सरकारचा निषेध केला.
यावेळी शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो! राज्य सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय!शेतकरी विरोधी सरकार हाय हाय!अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे फलक यावेळी दर्शविण्यात आले.
याप्रसंगी विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे,विधानसभा विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना प्रतोद सुनील प्रभू,आ. जयंत पाटील, आ. नाना पटोले, आ. बाळासाहेब थोरात, आ. अजय चौधरी,आ. वर्षा गायकवाड,आ. वैभव नाईक आदींसह महाविकास आघाडीचे नेते,आमदार उपस्थित होते.