You are currently viewing युवक काँग्रेस तर्फे ई पिक नोंद सप्ताह – अरविंद मोंडकर

युवक काँग्रेस तर्फे ई पिक नोंद सप्ताह – अरविंद मोंडकर

महाराष्ट्र राज्यातील आमच्या आघाडी सरकारच्या समनव्यातुन शेतकऱ्यांना पिक नोंद व शेतीची माहिती सुलभ होण्यासाठी महसूल विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेती संदर्भातील सर्व माहिती व शेतकऱ्यांना भविष्यातील शासकीय माहिती- मदत, लाभ याचा तत्काळ माहिती मिळावी या साठी ही नोंदणी उपयुक्त ठरणार आहे

आदरणीय मुख्यमंत्री उद्वव जी ठाकरे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व कृषी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत १५ ऑगस्ट पासून हा कार्यक्रम राबवला जात आहे
त्यासाठी स्वतः महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतात जाऊन शेतकऱ्यांना या बाबतची माहिती देत त्यांच्या पिकाची नोंद केली भविष्यात शेतकरी बांधव सुध्दा या ऑनलाईन प्रक्रियेत सहभागी होऊन शासनाच्या विविध योजना मिळवू शकतील
त्यां बाबत त्यांना माहिती देखील होईल
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या निर्देशनानुसार व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या सूचनेवरून सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण तालुका अध्यक्ष मेघनाथ धुरी यांच्या उपस्थितीत आज विधानसभा कुडाळ – मालवण मधील युवक काँग्रेस पदाधिकारी यांनी देखील या कामी शेतकऱ्यांना याबाबत माहिती देण्यासाठी सहकार्य करण्याचे ठरवले असून आज पासून *ई- पिक नोंद सप्ताह साजरा करण्यात येत आहे* यासाठी मालवण व कुडाळ मधील गावागावात जाऊन याबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांना अँप द्वारे त्यांच्या शेतपिकाची नोंद करून देण्यासाठी आज कोळंब या ठिकाणी पदाधिकारी यांनी एकत्र येऊन शेतात जाऊन शेतकरी श्री. आनंद प्रभू व इतर शेतकरी यांना मार्गदर्शन करून त्यांच्या पिकाची नोंद करून दिली या आठवड्यात मालवण व कुडाळ मध्ये याबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली

पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे भविष्यात ही मुदत वाढवता येईल का या साठी देखील युवक काँग्रेसच्या माध्यमातून कृषी मंत्री व महसूल मंत्री यांजवळ पाठपुरावा करण्यात येणार आहे

जुने सातबारे उतारे पाहिले तर त्यावर ठरावीकच पिकांची नोंद झालेली दिसून येते
प्रामुख्यानं आंबा, काजू, सोयाबीन, नारळ, कापूस या पिकांची नोंद आढळते

या मुख्य पिकांव्यतिरिक्त कमी क्षेत्र असलेल्या शेतात इतरही पीकं घेतली जातात.

आपल्या जिल्ह्यातील ज्यात सुपारी, कोकम, मिरी प्रमाणे इतर मसालेदार पदार्थ, चिबुड, काकडी, पडवळ, भोपळा, कार्ली अन्य भाजी पाला यांच्या नोंदी देखील भविष्यात करण्यात येऊ शकणार आहे
यामुळे लहान शेतातील सगळ्या पिकांची नोंद शेतकरी ई-पीक पाहणी अॅपच्या माध्यमातून सातबारा उताऱ्यावर नोंदवू शकणार आहेत.

यामुळे एखाद्या गावात नेमकं किती क्षेत्र पिकाखाली आहे, त्यात कोणतं पिक घेतलं जातं ते किती प्रमाणात येत त्यावर अजून काय प्रक्रिया करावी लागेल या बाबींचा अंदाज शासना प्रमाणे शेतकऱ्यांना देखील घेता येईल व त्यांना याची माहिती कळेल.

या आधारे सरकारी योजनांचा देखील लाभ शेतकऱ्यांना घेता येईल व शेतकऱ्यांना हे सोयीस्कर ठरेल.
या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी अपलोड केलेले सध्याच्या पिकांचे फोटो ही एक जमेची बाजू असणार आहे.

कोणत्या गट क्रमांकातून आणि खाते क्रमांकातून या फोटोची नोंद झाली हे सुद्धा कळेल

जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडे आजही काही प्रमाणात स्मार्टफोन नाहीत, अनेक ठिकाणी गावागावात इंटरनेट कनेक्शन सुध्दा नीट येत नसल्याने युवक काँग्रेस पदाधिकारी पल्लवी तारी व योगेश्वर कुर्ले यांनी नियोजन करत पुढाकार घेत शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी नोंदणी चालू केली आहे

काही शेतकऱ्यांना पीक पाहणी संबंधीचं पुरेसं प्रशिक्षणही नसल्याने शेतकऱ्यांना याबाबतीत माहिती देण्यासाठी शिबिरांच आयोजन करण्यासाठी कृषी व महसूल विभाग कार्यरत आहेत या साठी युवक काँग्रेस देखील पुढाकार घेणार आहे

प्ले – स्टोअर वर जाऊन अॅप डाऊनलोड करून ई पिक नोंद व पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात आलं

यावेळी मेघनाथ धुरी, जिल्हा युवकचे देवानंद लुडबे, प्रवक्ता अरविंद मोंडकर, युवक विधानसभा उपाध्यक्षा पल्लवी तारी, मालवण तालुका युवक अध्यक्ष अमृत राऊळ, शहर अध्यक्ष गणेश पाडगावकर, ममता तळगावकर, योगेश्वर कुर्ले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा