You are currently viewing १० डिसेंबरला सावंतवाडी तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या विद्यार्थी गुणगौरव सन्मान सोहळा

१० डिसेंबरला सावंतवाडी तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या विद्यार्थी गुणगौरव सन्मान सोहळा

सावंतवाडी :

 

रविवार १० डिसेंबरला कळसुलकर हायस्कूल हॉलमध्ये सावंतवाडी तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या विद्यार्थी गुणगौरव व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी तालुकाध्यक्ष गणेश म्हापणकर यांनी केले आहे.

या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून एलआयसी मुंबईचे अधीक्षक अभियंता रवी किशोर चव्हाण हे असून प्रमुख उपस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, माजी अध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम ओटवणेकर, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, जिल्हा खजिनदार नामदेव जाधव, जिल्हा सहसचिव बाबुराव चव्हाण, जिल्हा सदस्य विनायक चव्हाण, महिला जिल्हा सदस्य संजना चव्हाण, मार्गदर्शक तालुका माजी अध्यक्ष इंजिनिअर विजय चव्हाण तर कायदेशीर सल्लागार अॅड परशुराम चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमांमध्ये सावंतवाडी तालुक्यातील चर्मकार समाजातील सन २०२३ मधील स्कॉलरशिप, नवोदय विद्यालय परीक्षा, दहावी, बारावी, पदवी, पदविका, पदव्युत्तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून ही सभा दुपारी साडेतीन वाजता कळसूलकर इंग्लिश स्कूलच्या या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष म्हापणकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 3 =