You are currently viewing रास्त धान्य आणि केरोसीन विक्रेते संघटनेचे धरणे आंदोलन…

रास्त धान्य आणि केरोसीन विक्रेते संघटनेचे धरणे आंदोलन…

रास्त धान्य आणि केरोसीन विक्रेते संघटनेचे धरणे आंदोलन…

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत प्रशासनाचे वेधले लक्ष..

सिंधुदुर्गनगरी
रास्त भाव धान्य दुकानदाराच्या विविध मागण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रास्तभाव धान्य दुकानदार व रॉकेल धारक संघटनेमार्फत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तर प्रलंबित मागण्या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देत त्यांचे लक्ष वेधले.

सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रास्तभाव धान्य दुकानदार व रॉकेल धारक संघटनेमार्फत आज आपल्या विविध प्रलंबित मागण्याकड़े लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष
रुपेश पेडणेकर,उपाध्यक्ष कान्होबा देसाई,सचिव शैलेंद्र कुलकर्णी,जिल्हा प्रवक्ता अमित गावडे, किशोर नारकर, तात्या हाडये ,विकास गोखले,गणपत राणे, सतीश मोरजकर ,नितेश स्वरप,सुदर्शन फोपे,बाळू लुडबे,प्रदीप मांजरेकर, संजय मळीक, लक्ष्मण पवार यांच्यासह शेकड़ोंच्या संखेने जिल्ह्यातील रास्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

रास्त धान्य दुकानदाराच्या अनेक मागण्या प्रलबीत आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष केला जात असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.त्यांच्या विविध मागण्यामध्ये प्रमुख्याने आयुष्यमान भारत योजनेचे काम करताना तसेच मोफत धान्य वाटप करण्यासाठी दुकानात इंटरनेट सुविधा पूर्ण क्षमतेने मिळत नाही.त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शासकीय योजनेचे काम करण्यास धान्य दुकानात इंटरनेट सुविधा सर्वरचे बंद होणे ही डोके दुखी बनली आहे. तरी
शासनाने धान्य वितरणासाठी किंवा भविष्यात काही योजना शासनामार्फत राबविताना त्यासाठी आवश्यक असणारी इंटरनेट सुविधा पुरविण्यात यावी. तसेच ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२३ पर्यंतचे कमिशन अद्याप मिळाले नाही ते तत्काल मिळावे. यासह अन्य विविध मागण्या व समस्याकडे लक्ष वेधले. तसेच आजच्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातुन करण्यात आलेल्या मागण्या मान्य न झाल्यास १ जानेवारी पासून सर्व दुकाने बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला .

दरम्यान धरणे आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर जमलेल्या जिल्ह्यातील रास्त धान्य दुकानदारांची भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तर त्यांच्या समस्या बाबत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घडवून आणली.

प्रतिक्रिया व्यक्त करा