You are currently viewing कोलगाव आयटीआयजवळ झालेल्या भीषण अपघातात एक ठार

कोलगाव आयटीआयजवळ झालेल्या भीषण अपघातात एक ठार

सावंतवाडी

मुंबई गोवा जुन्या महामार्गावर कोलगांव आयटीआय जवळ
कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात नानेली घाडीवाडी येथील रोहित रामचंद्र कळसुलकर ( २१) याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक उत्तम उदय नेवगी (२३) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहेत. दुचाकीला एसक्रॉस गाडीची धडक बसल्याने हा अपघात घडला. याबाबतचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुडाळ तालुक्यातील माणगांव नानेली येथील हे दोघे युवक आपल्या ताब्यातील ( एम एच ०७ व्ही १११८ ) या दुचाकीने सावंतवाडी बाजारपेठेत कपडे आणि औषधे घेण्यासाठी आले होते. तेथेन ते घरी परतत असताना कोलगाव आयटीआय समोर आले असता त्यांची (एम एच ०७ एबी ७५७५) या आलिशान कारला धडक बसली. रोहित हा गाडीच्या मागे बसला होता. या धडकेत रोहित रस्त्यावर आदळल्याने त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.

दरम्यान, यावेळी तात्काळ रुग्णवाहिकेला  पाचारण करण्यात आले. मात्र, रुग्णवाहिका पोहोचायला बराच उशीर झाल्याने रक्तस्त्राव होऊन तो जागीच गतप्राण झाला. अनेक खाजगी वाहनांना देखील विनवणी करण्यात आली मात्र कोणीही त्याला आपल्या गाडीत घेतले नाही. त्यामुळे वेळीच उपचार होऊ न शकल्याने त्याला आपले प्राण गमवावे लागले. उशिरा त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
रोहित हा माणगाव हायस्कूलचा विद्यार्थी होता. सध्या तो सावंतवाडीत एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. त्याला वादनाची आवड होती. शिक्षण घेत असतानाच तो माणगाव येथील एका बॅन्जो पार्टी वादक म्हणून काम करत होता. तसेच अधून मधून तो वेल्डिंग काम ही करत असे. त्याला क्रिकेट खेळाची देखील आवड होती. त्याचा मित्रपरिवार खूप  मोठा होता.
त्याच्या पश्चात आई वडील भाऊ काका काकी चुलत भाऊ तीन चुलत बहीणी असा मोठा परिवार आहे. त्याचे वडील गवंडी काम करतात. त्यामूळे त्याच्या अकाली निधनाने कळसुलकर कुटुंबीयांवर दुःखाचा पहाडच कोसळला आहे.

दरम्यान, दुचाकी चालक उत्तम हा मुंबई येथे कामानिमित्त होता. तो काही कामासाठी गावात आला होता. मंगळवारी तो संध्याकाळी मुंबईत जाण्यासाठी निघणार होता. मात्र, त्याला या अपघातात तो जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच माणगाव, नानेली, आकेरी येथील ग्रामस्थ आणि त्यांचा मित्रपरिवार यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.
यावेळी सुरेश दळवी, रमेश केनवडेकर, कोलगाव सरपंच संतोष राऊळ, सचिन आदारी यांच्या सह सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे पोलीस उपनिरीक्षक आनंद यशवंते पीजी नाईक संतोष गलोले आधी घटनास्थळी दाखल झाले होते याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × five =