You are currently viewing जिल्ह्यात 26 जानेवारीपर्यत मनाई आदेश  l

जिल्ह्यात 26 जानेवारीपर्यत मनाई आदेश l

जिल्ह्यात 26 जानेवारीपर्यत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

         राज्यात विविध समाजाचे लोक आरक्षणाचे मुद्यावरुन आक्रमक होत आहेत. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष वाढीसाठी सभा, मेळावे व शिबीराचे आयोजन करण्यात येत असून पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांवर टिकाटिप्पणी करीत असतात. तसेच जिल्ह्यात वैयक्तीक व सामाईक मागणीकरीता उपोषणे, मोर्चा, संप, निदर्शने, रस्ता रोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येते अशावेळी आंदोलनकर्ते यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

            सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तीक व सामाईक मागणीकरीता उपोषणे मोर्चा, निदर्शने, रस्ता रोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येते अशावेळी आंदोलनकर्ते यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी जिल्ह्यातील विविध समाजाचा आरक्षण मुद्दा, तसेच जिल्ह्यात होणारी  उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रस्ता रोको या सारख्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोठेही अनुचित प्रकार घडू नये. जिल्ह्यातील जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी, यासाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू करण्यात येत आहे.

या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात पुढील कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे. कलम 37 (1) नुसार

1) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा  करण्यासाठी

   वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.

२) अंग भाजून टाकणार पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे.

३) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा

      करणे किंवा तयार करणे.

४)  व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे,

      (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.)

५)  सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे.

६)  सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग

       आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.

 कलम 37(3) नुसार

1)   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका काढणे   व  सभा घेणे.

   २)  हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, संबधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे. अशा व्यक्तींना आणि लग्न, धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही .

वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

*संवाद मीडिया*

*हमखास रिजल्ट देणारा ब्रँड म्हणजेच…_*

*🚒🚒 एस एस बोअरवेल 🚒🚒*

*🏟️बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव*🏟️

👉 *_विश्वसनीय सेवेची हमी म्हणजे एस एस बोअरवेल_*

_20 वर्षांहून जास्त सेवेचा अनुभव._

👉 *_संपूर्ण सिंधुदुर्गात कोठेही आणि कधीही आपल्या सेवेसाठी उपलब्ध…._*

_4.5″ /6″ /6.5 “/7” /9″/इंच बोअरवेल योग्य दरात खोदून मिळतील._

👉 _*अडचणीच्या ठिकाणी लांब 200 फुटापर्यंत बोअरवेल खोदून मिळेल.*_

_आर्थिन होल खोदून मिळतील.._

👉 *नामांकित कंपनीचे पंप सेट गॅरंटी सहित फिटिंग करून मिळतील.*

*अडकलेले पंप काढून मिळतील.पंप रिपेरिंग करून मिळतील.*

*🚒🚒 एस एस बोअरवेल. 🚒🚒*

👉 *प्रो. प्रा. समीर पाटील.*

*आमचा पत्ता :-*👇

*एस एस बोअरवेल*
*जाणवली, मुंबई गोवा हायवे लगत, जागृत मोटर्स समोर.*

*एस एस बोअरवेल आणि इलेक्ट्रिक वर्क्स, आचरा रोड, मारुती आळी, लक्ष्मी चित्रमंदिर नजीक, डॉ राणे हॉस्पिटल बाजूला.*

*आजचं संपर्क करा*
📞 *9421237130*
📞 *9422999594*
📞 *9011630901*
📞 *9284329683*
📞 *9420261271*
📞 *7666128596*
📞 *9011630901*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121457/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा