You are currently viewing इनोव्हा कारच्या धडकेत माडखोल येथे एक ठार
traffic accident, motorcycle collision with a car on city street

इनोव्हा कारच्या धडकेत माडखोल येथे एक ठार

इनोव्हा कारच्या धडकेत माडखोल येथे एक ठार…

आरसा धडकून घडला अपघात; दाणोली येथील एकावर गुन्हा दाखल…

सावंतवाडी

इनोव्हा कारची धडक बसल्याने माडखोल येथील बाबुराव धोंडी राऊत (वय ६८) यांचे निधन झाले. हा अपघात आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास माडखोल येथे घडला. दरम्यान या अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी दिनानाथ राजाराम बल्लाळ (वय ५१) रा. दाणोली बाजार यांच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत बाबुराव हे आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घरासमोर असलेल्या नदीच्या परिसरात फुले काढण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना आंबोलीच्या दिशेने येणाऱ्या इनोवा कारचा आरसा त्यांच्या दुचाकीला धडकला व ते रस्त्यावर कोसळले. ते उभे राहून थोड्यावेळाने काही अंतरावर पुन्हा चालत गेले व पुन्हा कोसळले. यावेळी कारचालक श्री. बल्लाळ यांनी त्यांना सावंतवाडी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी राऊळ याच्या अपघातास व मृत्यूत कारणीभूत ठरल्या प्रकरणी कारचालक बल्लाळ यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा