You are currently viewing मनसेच्या माध्यमातून 11 डिसेंबर रोजी समुद्र किनारा स्वच्छता मोहीम

मनसेच्या माध्यमातून 11 डिसेंबर रोजी समुद्र किनारा स्वच्छता मोहीम

मनसे नेहमीच लोकउपयोगी उपक्रम करून समाजसेवेचे व्रत जोपासत असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना ही पर्यावरणपूरक उपक्रम आणि अभियानद्वारे पर्यावरणाचा समतोल राखत असते .याच अंगीकृत विभागाद्वारे महाराष्ट्रात मा.नेते श्री अमितसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून किनारपट्टीवर “समुद्र किनारा स्वच्छता मोहीम” आयोजित करण्यात येत आहे.या अभियाना द्वारे जनसामान्यांमध्ये आपले समुद्र किनारे स्वच्छ आणि सुंदर राखण्याबाबत जागरूकता यावी असा आमचा प्रयत्न आहे.


महाराष्ट्रातल्या ७२०किमी.लांबीच्या किनारपट्टीवरील प्रमुख समुद्र किनारे या मोहिमअंतर्गत स्वच्छ करण्यात येणार आहेत.
या मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर समुद्र किनारा आणि वेंगुर्ले तालुक्यातील वेळागर(शिरोडा), सागरेश्वर(वेगुर्ले) समुद्र किनारा स्वच्छ करण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी वर्ग,मच्छीमार संगठना,सामाजिक संगठना,शासकीय कर्मचारी संगठना,सेवाभावी संस्था,विद्यार्थी वर्ग आदींनी उस्फुर्त पणे सहभाग घ्यावा ..

उपक्रम शनिवार 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत होणार आहे. असे आवाहन जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केले आहे…

प्रतिक्रिया व्यक्त करा