You are currently viewing बांदा ग्रामपंचायत मौनावस्थेत

बांदा ग्रामपंचायत मौनावस्थेत

*बांदा ग्रामपंचायत मौनावस्थेत

सर्वसामान्य नागरिक गैरसोयीने हैराण*

बांदा

सध्या बांदा येथील मुख्य चौकात फ्लायओव्हरचे काम चालू आहे. सदरचे काम हे सगळे नियम- कायदे धाब्यावर बसवुन बेपर्वाईने सुरू आहे. फ्लायओव्हचे काम करीत असताना नियमानुसार मुख्य फ्लायओव्हरच्या बाहेरील बाजूच्या पुढे नऊ मीटर रुंदीच्या दोन्ही बाजूच्या साईड रोडचे पाच थरांचे चांगल्या प्रतीचे काम करून तो सर्वप्रथम रहदारीसाठी खुला करून नंतरच मधल्या मुख्य फ्लायओव्हरचे काम करणे आवश्यक होते. परंतु सद्यस्थितीत असलेलेच जुने साईड रोड पुन्हा वापरात आणून त्यावरून चालू असलेल्या कामाचे चिखलयुक्त पाणी सोडून, छोट्या धुळमातीने माखलेल्या रस्त्यांवरून वाहतूक करावयास लावून,लोकांची अतोनात गैरसोय व त्रास देऊन काम रेटले जात आहे. दोन्ही बाजूने बांधण्यात येणाऱ्या काँक्रीट गटारांवर रोज तीनवेळा पाणी मारणे अत्यावश्यक असताना लगेच दुसऱ्या दिवशी त्या काँक्रीटवर माती ओढली जाते. जे उद्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणे आहे. उद्या सदर काँक्रीट फुटून त्यात कोणी निष्पाप नागरिक पडून अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण ?? बांधलेल्या गटारांना पाण्याच्या निचऱ्यासाठी ड्रेनेज पाईप टाकणे आवश्यक असताना बांदा एसटी स्टँड जवळ बंदिस्त गटार करण्यात आला. ज्यामुळे पावसाळ्यात तेथे पाणी साचून राहणार. त्यास जबाबदार कोण?? रात्रौच्या वेळी सदर काम चालू असलेल्या संपूर्ण रस्त्यावर सिग्नल लाइट्स,रंबल्स, दिशादर्शक फलक हे सुरक्षेच्या दृष्टीने लावणे अत्यावश्यक असताना देखील केवळ एक लाईट लावण्यात आलेली आहे.

अशा पद्धतीचे बेजबाबदार, नागरिकांच्या गैरसोयीचे व असुरक्षित काम चालू असताना व बांदा शहरातील सर्वसामान्य नागरिक यामुळे त्रस्त असताना, आपल्या याबाबतच्या समस्यांची कल्पना वेळोवेळी ग्रामपंचायतला दिलेली असताना देखील बांदा ग्रामपंचायत सदर कामाबद्दल एक चकार शब्द काढायला तयार नाही हे अनाकलनीय आहे.उलट पक्षी सदर कामाचा कोणताही आराखडा ग्रामपंचायतकडे उपलब्ध नसल्याचे माहितीच्या अधिकारात मागितलेल्या पत्रास उत्तर देण्यात आले. सदर कंत्राटदारास याबाबत जाब विचारण्यास देखील ग्रामपंचायत सदस्य तयार नाहीत. सदर ठिकाणी बांदा सरपंच यांच्या स्वतःच्या व्यवसायाचे ठिकाण देखील आहे. तरीही नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांच्याकडुन काहीही केले जात नाही.

बांदा सटमट येथे देखील चालु असलेल्या अंडरपासच्या कामाबाबत देखील तेथील स्थानिक रहिवासी तसेच स्थानिक तरुण व्यावसायिक यांनी अनेकदा ग्रामपंचायतीकडे विनंती व तक्रार करून देखील त्याबाबत देखील गांभीर्याने विचार करून कोणतीही पावले उचलली जात नाहीत हे दुदैर्वी आहे.

लोकांनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी व होणाऱ्या त्रासाचे निवारण करण्याकरिता ग्रामपंचायत सदस्यांना निवडून आणले हेच कदाचित सत्ताधारी व विरोधक दोन्ही विसरलेत की काय ?? तसेच यात काही आणखी वेगळे व्यवहार दडलेले आहेत की काय ??असा दाट संशय सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

याबाबतचा नागरिकांचा असलेला रोष हा सत्ताधारी व विरोधक या दोघांनीही लक्षात घ्यावा. सदर चालू असलेले काम हे येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना वाहतुकीला कसलाही त्रास न होता, नियम पाळून, चांगल्या दर्जाचे व्हावे एवढीच माफक अपेक्षा आम्ही नागरिक ग्रामपंचायतीकडून करतोय.

आता तरी ग्रामपंचायतीने आपले मौनव्रत सोडावे, झोपेतून जागे व्हावे व आपले कर्तव्य पार पाडावे ही अपेक्षा.श्री.गुरु कल्याणकर( सामाजिक कार्यकर्ता),श्री हेमंत दाभोळकर (सामाजिक कार्यकर्ता)श्री निलेश सावंत (माजी सैनिक) यांनी व्यक्त केली आहे.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा