You are currently viewing न्यु इंग्लिश स्कुल भेडशी आणि ज्युनियर कॉलेज १० डिसेंबरला होणार सुरू

न्यु इंग्लिश स्कुल भेडशी आणि ज्युनियर कॉलेज १० डिसेंबरला होणार सुरू

नववी-दहावी व अकरावी-बारावीचे भरणार वर्ग

दोडामार्ग
भेडशी येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर काँलेज भेडशी येत्या गुरुवारी १० तारीखपासुन सुरू होणार आहे. यामध्ये माध्यमिकचे इयत्ता नववी व दहावी तर उच्च माध्यमिक अकरावी व बारावी वर्ग शासनाचे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना नियम अटींचे पालन करून विद्यार्थ्यांनच्या आरोग्याची काळजी घेवून येत्या गुरुवारी१० तारीख पासून पुर्वीच्या वेळेप्रमाणे उच्च माध्यमिक सकाळी ७.३० वा.माध्यमिक ११ वाजता या वेळेत सुरू होणार याची पालक विद्यार्थी यांनी नोंद घ्यावयाची आहे.

पालक व शिक्षक यांच्या विचार विनिमयातुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहीती विद्यायलाच्या मुख्याध्यापिका सौ.स्नेहा गवस यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + nineteen =