You are currently viewing बालकुमार साहित्य- कला संमेलन अध्यक्षपदी कवी अजय कांडर…

बालकुमार साहित्य- कला संमेलन अध्यक्षपदी कवी अजय कांडर…

बालकुमार साहित्य- कला संमेलन अध्यक्षपदी कवी अजय कांडर…

प्राचार्य डॉ.सुशीलकुमार शिवलकर यांच्या हस्ते उद्घघाटन..

कणकवली

मुलांना शालेय जीवनातच साहित्य कला संस्कृती आदी संदर्भात आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या उपजत गुणांना प्रेरणा मिळावी यासाठी राजे प्रतिष्ठान सिंधू आणि ओसरगांव शाळा नं.१ च्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर महिन्यात एकदिवशीय साहित्य- कला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ओसरगांव प्रा.शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठीतील सुप्रसिद्ध कवी आणि स्तंभलेखक अजय कांडर यांची निवड करण्यात आली आहे.

तर संमेलनाचे उद्घघाटक म्हणून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गचे प्राचार्य डॉ.सुशीलकुमार शिवलकर यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती राजे प्रतिष्ठान सिंधूचे अध्यक्ष विवेक परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जीवबा अपराज, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अँड.विलास परब आणि मुख्याध्यापक किशोर कदम यांनी दिली.
बदलत्या काळात विद्यार्थ्यांना सुसंस्कृत बनवायचे असेल तर शालेय जीवनापासून कला संस्कृतीचे संस्कार त्याच्यावर होणे गरजेचे आहे. यासाठी शाळेतील शिक्षक जेवढी मेहनत घेऊ शकतात तेवढीच मेहनत गावातीलही सुशिक्षित तरुणांनी घेण्याची गरज असल्यासचे लक्षात आल्यावर ओसरगाव येथील राजे प्रतिष्ठान सिंधूच्या तरुण पदाधिकाऱ्यांनी गावातील शैक्षणिक कामाला प्रारंभ केला आणि यातूनच एक दिवशीय विद्यार्थी साहित्य कला संमेलनाचे आयोजन करण्याची कल्पना पुढे आली. राजे प्रतिष्ठान सिंधू प्रारंभी खेळ आणि इतर क्षेत्रात गावात काम करत होते. पण तरुणांच्या सकारात्मक दृष्टिकोनातून आता हे प्रतिष्ठान शैक्षणिक दृष्ट्या कार्यरत झाले असून आता प्रतिष्ठानने ओसरगाव गावच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किशोर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या एक दिवशीय साहित्य संमेलनाचेही आयोजन केले आहे.
डिसेंबर मध्ये होणाऱ्या या संमेलनाची रूपरेषा आणि संमेलन तारीख काही दिवसातच जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही राजे प्रतिष्ठान सिंधू आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.संमेलनाच्या अधिक माहितीसाठी संपर्क- 9422963655 साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा