You are currently viewing शिक्षक भारतीच्या जिल्हा सचिवपदी समीर परब तर संघटक म्हणून आकाश पारकर यांची सर्वानुमते निवड

शिक्षक भारतीच्या जिल्हा सचिवपदी समीर परब तर संघटक म्हणून आकाश पारकर यांची सर्वानुमते निवड

तळेरे

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती सचिवपदी दोडार्मागचे समीर परब तर संघटकपदी देवगड तालुक्यातील आकाश पारकर,तसेच जिल्हा सह संघटक म्हणून सागर एकनाथ फाळके .(श्री आरेश्वर हायस्कुल आरे ता देवगड )आणि देवगड तालूका उपाध्यक्ष म्हणून रुपेश गंगाराम बांदेकर (पेंढारी पंचक्रोशीमाध्यमिक विद्यालय पेंढारी)यांची संघटनेच्या रिक्त झालेल्या जागी सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने अग्रही असलेल्या शिक्षक भारती सिंधुदुर्गचे सचिव सुरेश चौकेकर यांच्या सेवा निवृत्तीमुळे रिक्त झालेले पद भरण्यासाठी शिक्षक भारती जिल्हापदाधिकारी यांची ऑनलाइन सभा जिल्हाध्यक्ष संजय
वेतुरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सदर सभेला सर्व जिल्हा पदाधिकारी तसेच तालुका अध्यक्ष व सचिव मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

प्रामाणिकपणे पदाला न्याय देण्याचा प्रयत्न:- सुरेश चौकेकर
शिक्षक भारतीच्या स्थापनेपासून मी अंत्यत प्रामाणिकपणे माझ्याकडे असलेल्या सचिव पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. याकामी मला सर्व पदाधिकारी यांची अनमोल साथ मिळाली .त्यामुळेच शिक्षक भारतीचा आज वटवृक्ष तयार झाला आहे. संघटनेच्या कुशल नेतृत्वामुळे अनेक
निष्ठावान शिलेदार तयार झाले असे गौरवोद्गार संघटनेचे सेवानिवृत्त सचिव सुरेश चौकेकर यांनी आपल्या मनोगतात भावना व्यक्त केल्या.
ते पुढे म्हणाले की, घटनेनुसार मी जरी त्या पदावर नसलो तरी संघटनेच्या प्रत्येक उपक्रमासाठी नेहमी उपलब्ध असेन अशी ग्वाहीही त्यानी दिली.

..म्हणूनच मी आणि संघटना भाग्यवान:- संजय वेतुरेकर

सूरेश चौकेकर सरांसारखे अभ्यासू व अनुभवी निष्ठावान,विश्वासू व्यक्तिमत्व मला सचिव म्हणून लाभले .हे माझं आणि संघटनेचे भाग्य समजतो अशा शब्दांत जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी श्री. चौकेकर सरांच्या कार्याचे विशेष कौतुक करीत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर राज्य प्रतिनिधी सी.डी.चव्हाण यांच्यासह अनेक जिल्हा पदाधिकाऱ्यांनीही मनोगत व्यक्त करताना चौकेकर सरांच्या आदर्श कार्यप्रणालीचे विशेष कौतुक करीत त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. भविष्यात असेच मार्गदर्शन करण्याची विनंतीही केली.
सभेचे सुत्रसंचलन प्रशांत आडेलकर यांनी तर आभार दत्तात्रय मारकड यांनी मानले.
दरम्यान सभेने समीर परब यांनी रिक्त झालेले जिल्हा सचिव पद स्विकारावे तर त्यांच्या रिक्त जागी जिल्हा संघटक म्हणून युवा शिक्षक आकाश पारकर यांनी पदभार सांभाळावा तसेच सहसंघटक पदी सागर फाळके तर देवगड तालुका उपाध्यक्ष पदी रूपेश बांदेकर यांची निवड सर्वानुमते निर्णय झाला.
सर्व नुतन जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकाऱ्यांचे शिक्षक भारतीचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षक आमदार कपिल पाटील ,राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे,राज्य उपाध्यक्ष धनाजी पाटील ,राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर ,राज्य प्रतिनिधी सी.डी. चव्हाण व सर्व जिल्हा पदाधिकार्‍यानी अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा