You are currently viewing संगीत-बालनाट्य, नृत्यनाट्य तसेच शास्त्रीय संगीताच्या सुरावटीवर पु. ल. कला महोत्सव २०२३ची सुरेल सांगता

संगीत-बालनाट्य, नृत्यनाट्य तसेच शास्त्रीय संगीताच्या सुरावटीवर पु. ल. कला महोत्सव २०२३ची सुरेल सांगता

*संगीत-बालनाट्य, नृत्यनाट्य तसेच शास्त्रीय संगीताच्या सुरावटीवर पु. ल. कला महोत्सव २०२३ची सुरेल सांगता*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई आयोजित पु. ल. कला महोत्सव २०२३ च्या सहाव्या दिवशी सकाळी ६.३० वा. अभ्यंग संगीत साधना महोत्सव – दीपावली पहाट हा कार्यक्रम सादर झाला. पं. शैलेश भागवत यांच्या सुंदर सनई वादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांचा शास्त्रीय संगीताचा सुरेल कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रमास विशेष अतिथी पं. डॉक्टर राम देशपांडे उपस्थित होते.

यानंतर नवीन लघुनाट्यगृह येथे बाल दिनाचे औचित्य साधून विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना मानवंदना देऊन कलांगण मुंबई या संस्थेने फुलवा मधुर बहार हे संगीत बालनाट्य सादर केले.

आपल्या आजूबाजूला बागेत अनेक फुलझाडं असतात. प्रत्येक फुलाचा एक अनोखा रंग आणि विशिष्ट गंध असतो. प्रत्येक फुलाला आपल्या सुगंधाचा रंगाचा एक वेगळा अभिमान असतो एकमेकांत मतभेद असतात या संकल्पनेवर आधारित लहान मुलांनी वेगवेगळ्या फुलांची भूमिका, त्यांच्यातील संवाद, सुंदर वेशात आणि आपल्या सुमधुर गाण्यांनी हे नाट्य साकारून सर्व फुलांनी एकत्र येऊन नेहमी मधुर बहार फुलवत रहावा हा सुंदर संदेश ‘फुलवा मधुर बहार’ या संगीत बालनाट्यातून देण्यात आला. या बालनाट्याचं दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन वर्षा भावे यांनी केलं. तसेच वाद्यसंयोजन आणि पार्श्वसंगीत कमलेश भडकमकर यांचं होतं. नृत्य रचना- सायली महाडिक, व्यवस्थापन- शैलेश सामंत तसेच कलांगणच्या १३ बालकलाकारांनी हा सुंदर नाट्यप्रयोग सादर केला.

या कार्यक्रमास नुकताच प्रदर्शित झालेला ‘श्यामची आई’ या चित्रपटातील बालकलाकार शर्व गाडगीळ आणि चित्रपटाच्या निर्मात्या अमृता राव उपस्थित होत्या त्यांनी कार्यक्रमाबाबतीत आपलं मनोगत व्यक्त करून सर्व बालकलाकारांचे कौतुक केले.

यानंतर सायंकाळी ५ वा. सोनिया परचुरे यांचा भारतीय आणि पुराणातील देवी-देवतांवर आधारित शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा जागर अभ्यंग संगीत साधना महोत्सव ‘भगवती’ हा कार्यक्रम नृत्य नाट्यातून सादर झाला. आध्यात्मिक कथानकातील सीतेच अपहरण, रावणाचा वध, शंकर पार्वती विवाह, देवीचा गोंधळ अशा अनेक घटनांवर आधारित अप्रतिम असा अभिनय नृत्याविष्कार परचुरे आणि सह कलाकारांनी सादर केला.

यानंतर पु. ल. कला महोत्सवाचा शेवटचा कार्यक्रम विदुषी कलापिनी कोमकली यांचा अभ्यंग संगीत साधना महोत्सव ‘दीपावली संध्या’ सादर झाला. शास्त्रीय संगीतातील बहारदार गाणी ‘आज मी रुसून आहे’, ‘खुलता कळी खुलेना…’, ‘सावरिया ऐ्जैओ’ अशा अप्रतिम गाण्यांनी विदुषी कलापिनी कोमकली यांनी दाद मिळवली. कार्यक्रमास विशेष अतिथी पं. अमरेंद्र धनेश्वर उपस्थित होते. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालिका मीनल जोगळेकर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शुभंकर करंडे, राजुली सुभाष आणि निमिषा वालावलकर यांनी पु. ल. कला महोत्सवाचे सुत्रसंचालन केले.

संगीत बालनाट्य नृत्य नाट्य तसेच शास्त्रीय संगीताच्या सुरेल गायनाने पु. ल. कला महोत्सवाचा शेवटचा दिवस सांगितीक वातावरणात पार पडला. रसिकांचा उदंड प्रतिसाद या संपूर्ण महोत्सवाला मिळाला.

 

*संवाद मिडिया*

 

💥 *”रेन्बो हिल्स” ची खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”..💥🏬*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨

 

मळगाव-कुंभार्ली🏕️ येथील ️ रेरा ॲक्ट📜 नुसार मान्यता📃 असलेल्या न्यू-मॅक्स डेव्हलपर्स🏠 यांच्या “रेन्बो हिल्स🌈” मध्ये ग्राहकांसाठी🥰 आम्ही देतोय खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”…!🚩💥🤩

 

👉 स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि GST फ्री… फ्री… फ्री…!!!

 

🔸 बँक मान्यता प्राप्त प्रोजेक्ट,

🔹सॅम्पल सदनिका रेडी,

🔸गृह कर्जाची सुविधा,

🔹दिलेल्या वेळेच्या अगोदर पझेशन…!

 

🛑रेरा नं. P52900022211

 

फक्त ५१ हजारात आपल्या स्वप्नातील घर बुक 💰 करा..🤟

 

🏚️New Max Developers🏘️

यांचा चौथा महत्त्वकांक्षी प्रकल्प

🌈”रेन्बो हिल्स”🏞️

 

🛑आम्ही मळगाव येथे देतोय:-

👉1RK फ्लॅट्स फक्त १५.५० लाख

👉1BHK फ्लॅट्स फक्त १९.५० लाख

👉2 BHK फ्लॅट्स फक्त २५.५० लाख

 

👉तात्काळ बुकिंग📃 केल्यास अजून ५० हजाराची💰 सवलत…! तर ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी..🗓️!

 

मग वाट कसली बघताय..!🤔 ५१ हजार 💰 रुपये द्या..! आणि आपला हक्काचा 🏦 फ्लॅट🏢 तात्काळ बुक करा…!🔖

 

🛑आमची वैशिष्ट्ये:-👇

 

♦️सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन हाकेच्या अंतरावर…!🗣️

♦️मुंबई-गोवा महामार्ग अवघ्या पाच मिनिटावर…!🛣️

♦️सावंतवाडी बाजारपेठ पाच किलोमीटरवर…!🛍️

♦️निसर्गरम्य आणि शांत वातावरणात राहण्याचा आनंद.!🌴

♦️उच्च प्रतीचे बांधकाम आणि सुसज्ज इमारती…🏢

 

🏡आमचा पत्ता:-

सावंतवाडी रेल्वेस्टेशन जवळ, शालू हॉटेलच्या बाजूला, कुंभार्ली-मळगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

📲संपर्क:-

9653693804 / 8104829770

 

*YouTube Link👇*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

 

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा