You are currently viewing पारिजात साहित्य समूहाचे पहिले राज्यव्यापी कविसंमेलन नवी मुंबईत

पारिजात साहित्य समूहाचे पहिले राज्यव्यापी कविसंमेलन नवी मुंबईत

*संमेलनाध्यक्षपदी गझलकार ए. के. शेख, उद्घाटक श्री.सुनील छाजेड तर कादंबरीकार राजश्री भावार्थी प्रमुख अतिथी*

 

मुंबई(प्रतिनिधी):

 

पारिजात साहित्य समूहाचे पहिले संमेलन दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी केमिस्ट भवन सानपाडा, नवी मुंबई येथे संपन्न होणार आहे. त्यानिमित्त आयोजित केलेल्या राज्यव्यापी कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध गझलकार ऄ. के. शेख यांच्या नावाची घोषणा केली तर श्रेष्ठ कवयित्री कादंबरीकार राजश्री भावार्थी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. कवी संमेलनाचे उद्घाटन नवी मुंबई रिटेल केमिस्ट अँड होलसेलर्स असोसिएशनचे सचिव श्री.सुनील छाजेड यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.

पारिजात आयोजित कवीसंमेलनासाठी गझलकारा उर्मिला बांदिवडेकर, कवी विजय जोशी, कवी अनंत जोशी, गझलकार साबिर सोलापुरी बदीऊज्जमा बिराजदार, कवी बाळासाहेब तोरस्कर, गझलकार कैलास गायकवाड, कवी दीपक पटेकर, कवयित्री भारती भाईक, कवयित्री फरजाना डांगे, ॲड. तेजस गायकवाड, बा. ह. मगदूमम, डॉ.श्यामल पाटील अग्रवाल, गझलकार मोहन जाधव आणि गझलकार सिराज शिकलगार इत्यादी महाराष्ट्रातील आघाडीचे कवी, साहित्यिक आणि गझलकार विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सदर कविसंमेलनात पारिजात साहित्य समूह सदस्यांसह इतरही समूहातील कवी, कवयित्री आपल्या स्वरचित रचना सादर करणार आहेत. या संमेलना प्रसंगी पारिजात साहित्य समूहाच्या संचालिका शबाना मुल्ला यांचे “धुक्यातले दवबिंदू” या पहिल्या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. त्यासोबतच कथाकार, कादंबरीकार राजश्री भावार्थी यांची “शापित सौंदर्य एक अनोखी कथा” या पुस्तकाचेही प्रकाशन होत आहे, अशी माहिती समूहाचे प्रशासक प्रा. एस. यु. मुल्ला यांनी दिली. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन नंदिनी काळे, रश्मी थोरात आणि प्रदीप बडदे आदी पारिजात समूह सदस्य करणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा