You are currently viewing शेतक-यांच्या 8 डिसेंबरच्या भारत बंदला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा

शेतक-यांच्या 8 डिसेंबरच्या भारत बंदला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा

– सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते इर्शाद शेख.

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी व शेतक-याना देशोधडीला लावणा-या केलेल्या काळ्या कायद्यांच्या विरोधात व ते काळे कायदे रद्द करण्यासाठी देशातील शेतकरी वर्ग दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहे. दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत गेले अनेक दिवस रस्त्यावर उतरलेल्या शेतक-याच्या विषयी या गेंड्याची कातडी पांघरलेल्या आणि देशातील जनतेसाठी नाही तर फक्त धनदांडग्यांसाठी काम करणा-या अंध सरकारला कोणत्याही प्रकारची सहानुभूती नाही उलट या शेतकरी बांधवांवर कडाक्याच्या थंडीत थंड पाण्याचा मारा केला जात आहे, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत, लाठीमार केला जात आहे. देशातील कोट्यवधी शेतक-यांचा या कायद्याना विरोध आहे मग केंद्र सरकारने हे कायदे कोणासाठी केले आहेत? म्हणून 8 डिसेंबर रोजी होणा-या बंदला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पुर्ण पाठिंबा आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील शेतक-यांना 7/12 वरील नांव कायम राहण्यासाठी 8/12 च्या बंदला पाठिंबा द्या असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते इर्शाद शेख यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =