You are currently viewing अंबरग्रीस / वन्यजीव अवशेष किंवा मृगय चिन्हे स्वेच्छेने जमा करावीत

अंबरग्रीस / वन्यजीव अवशेष किंवा मृगय चिन्हे स्वेच्छेने जमा करावीत

अंबरग्रीस / वन्यजीव अवशेष किंवा मृगय चिन्हे स्वेच्छेने जमा करावीत

–  उपवनसंरक्षक (प्रादेशिक)  मिलीश शर्मा

सिंधुदुर्गनगरी

वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षित वन्यजीवांचे अवयव किंवा अवशेष (मृगयचिन्हे), अंबरग्रीस (Ambergris) / व्हेल वॉमिट अथवा इतर वन्यजीव साहित्य यांचा ताबा, साठवण, विक्री किंवा वाहतूक करणे दंडनीय अपराध आहे. तसेच वन्यप्राण्यांपासून मिळणारे कोणतेही वन्यजीव अवशेष / वन्यजीव पदार्थ हे वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 अंतर्गत संरक्षित आहेत. त्यामुळे अशा वस्तूंना कायद्यानुसार शासकीय मालमत्ता मानले जाते. तरी अशा वस्तू सापडल्यास त्या सावंतवाडी वन विभागाकडे स्वखुशीने व स्वेच्छेने जमा कराव्यात असे आवाहन, सावंतवाडीचे उपवनसंरक्षक (प्रादेशिक)  मिलीश शर्मा यांनी केले आहे.

जर कोणाकडे अंबरग्रीस, वन्यजीव अवशेष, शिंगे, कातडी, दात, नखे किंवा इतर वन्यजीव अवशेष असल्यास त्यांनी ते स्वखुशीने व स्वेच्छेने जवळच्या वनकार्यालयात जमा करावेत, नागरिकांनी अशा वस्तूंची खरेदी विक्री, लपवणूक किंवा वाहतूक करु नये अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच वन्यजीव अवयवांच्या अवैध व्यापारासंदर्भात कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाशी दूरध्वनी क्रमांक 02363-272005 वर संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, तरी नागरिकांनी वन विभागास सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. शर्मा यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा