You are currently viewing सुप्रसिद्ध सुवर्णकार ‘मडकईकर ज्वेलर्स’ नव्या दालनाचा शुभारंभ आम. नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न

सुप्रसिद्ध सुवर्णकार ‘मडकईकर ज्वेलर्स’ नव्या दालनाचा शुभारंभ आम. नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न

सावंतवाडी :

सावंतवाडी व कुडाळ येथील सुप्रसिद्ध सुवर्णकार ‘मडकईकर ज्वेलर्स’ च्या १ ग्रॅम गोल्ड दागिन्यांच्या नव्या दालनाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाला. यापुढेही अशीच प्रगती करीत रहा, आमच्या सदिच्छा तुमच्यासोबत सदैव आहेत, अशा शब्दांत आ. नितेश राणे यांनी मडकईकर कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी विराग मडकईकर, सौ. वैष्णवी मडकईकर, श्यामसुंदर मडकईकर, वसुंधरा मडकईकर, पराग मडकईकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सारंग, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, जिल्हा बँक संचालक रवी मडगांवकर, गजानन गावडे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, भाजपा तालुकाध्यक्ष महेश धुरी, माजी जि. प. सभापती अंकुश जाधव, गुरुनाथ पेडणेकर, संजू शिरोडकर, महिला शहाराध्यक्षा मोहिनी मडगांवकर आदी उपस्थित होते.

सावंतवाडी उभा बाजार रघुनाथ मार्केट समोर एस एम मडकईकर ज्वेलसचे हे भव्य असे वातानुकुलीत दालन सुरू करण्यात आले. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते फित कापून तसेच दीप प्रज्वलन करून या दालनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मडकईकर कुटुंबियांनी आमदार नितेश राणे यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

यावेळी सुवर्णकार राजू पनवेलकर, गुरु मठकर, शेखर पोकळे, सुनिल पोकळे, आबा केसरकर, नंदू बांदिवडेकर, बाळा मडगांवकर, शाम पडते, विनोद पोकळे, अजय मडगांवकर, संजय मडगांवकर, सुहास चिंदरकर, शेखर धारगळकर, काशिनाथ कोरगांवकर, अरुण भिसे, उत्तम धारगळकर, गुरु जामसंडेकर भाजपचे कार्यकर्ते महेश धुरी, आत्माराम गावडे, दिलीप भालेकर, परिक्षीत मांजरेकर, आत्माराम गावडे, उमेश पेडणेकर, दिपाली भालेकर, मधुकर देसाई, विनोद सावंत, मेघना साळगांवकर,आदी उपस्थित होते.यावेळी आमदार नितेश राणे यांनी भाजपचे माजी शहराध्यक्ष सुवर्णकार संजू शिरोडकर यांच्या सराफ पेढीलाही भेट देत शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा