You are currently viewing भाजपचा आम. वैभव नाईक यांना मोठा धक्का

भाजपचा आम. वैभव नाईक यांना मोठा धक्का

१४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सरपंच पदासह ११ जागांवर भाजप पुरस्कृत उमेदवारांचा विजय..

 

मालवण :

 

मालवण तालुक्यातील प्रतिष्ठेची असलेली आचरा ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का दिला. १४ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत सरपंच पदासह ११ जागांवर भाजप पुरस्कृत उमेदवारांनी विजय मिळविला आहे. तर केवळ दोन जागांवर उबाठा शिवसेना महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार विजयी झाले. दरम्यान चाफेखोल ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत रविना घाडीगावकर या ३९ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी मयुरी घाडीगावकर यांचा पराभव केला.

तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीची निवडणूक भाजप, उबाठा शिवसेना-महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची बनविली होती. यात महाविकास आघाडीकडून सरपंच पदासाठी मंगेश ऊर्फ जिजा टेमकर तर भाजपकडून जेरॉन फर्नांडीस यांच्यात काटे की टक्कर होती. दोन्ही बाजूंकडून गावात जोरदार प्रचार यंत्रणा राबविण्यात आली होती. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. काल या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते.

आज सकाळी साडे दहा वाजल्यानंतर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार वर्षा झालटे, निवासी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, निवडणूक निर्णय अधिकारी संदीप गावडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुरारी भालेकर यांच्या उपस्थितीत मतमोजणीच्या प्रक्रियेस सुरवात झाली. यात सरपंच पदाचे भाजप पुरस्कृत उमेदवार जेरॉन फर्नांडीस यांनी २४२ मतांनी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार मंगेश टेमकर यांचा पराभव केला. जेरॉन फर्नांडीस यांचा विजय झाल्याचे समजताच तहसील कार्यालयाच्या परिसरात जमलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, नारायण राणे तुम आगे बढो, निलेश राणे तुम आगे बढो अशा घोषणा देत एकच जल्लोष केला.

यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य देवदत्त सामंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, राजन गावकर, नीलिमा सावंत, अभि सावंत, राजन गावकर, संतोष लब्दे, अभय भोसले यांच्यासह अन्य भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणुकीचा प्रभागवार निकाल असा- प्रभाग एक- सरपंच- मंगेश टेमकर ३२० मते, जगदीश पांगे १६ मते, जेराॅन फर्नांडिस ३३३, नोटा ११ मते, प्रभाग एक उमेदवार- सारिका तांडेल ३३८ मते (विजयी), प्रिया मेस्त्री ३०० मते, पूर्वा तारी ३०० मते (विजयी), प्रियता वायंगणकर २७३ मते (विजयी), गौरी सारंग ८८ मते, नोटा १९ मते, मुजफर मुजावर ३७६ मते (विजयी), चंद्रशेखर मुणगेकर २८९ मते, नोटा १६ मते.

प्रतिक्रिया व्यक्त करा