जिओ कडून 5G तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी..

जिओ कडून 5G तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी..

भारतात लवकरच होणार लॉंच

नवी दिल्ली : 

अमेरिकन टेक्नॉलॉजी फर्म क्वालकॉमसोबत रिलायन्स जिओने अमेरिकेत आपल्या 5G टेक्नॉलॉजीचं यशस्वी परिक्षण केलं आहे. अमेरिकेचं सैन्य डियोगोमध्ये एका वर्च्युअल इव्हेंटमध्ये ही घोषणा करण्यात आली. रिलायन्स जिओचे प्रेसिडंट मेथ्यू ओमानने क्वालकॉम इव्हेंटमध्ये सांगितलं की, क्वालकॉम आणि रिलायन्सची सब्सिडरी रेडिसिससोबत एकत्र येत आम्ही 5G तंत्रज्ञान विकसित करत आहोत. जेणेकरून लवकरात लवकर भारतात हे तंत्रज्ञान लॉन्च केलं जाऊ शकेल.

जवळपास तीन महिन्यांपूर्वी 15 जुलै रोजी रिलायन्स इंडस्ट्रीच्या बैठकीत रिलायन्स जिओचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी 5G टेक्नॉलॉजी विकसित करण्याची घोषणा केली होती.

देशी साधनसामुग्रीचा वापर करून विकसित करण्यात आलेलं तंत्रज्ञान देशाला समर्पित करत मुकेश अंबानी म्हणाले होते की, 5G स्पेक्ट्रम उपलब्ध होताच रिलायन्स जिओ 5G तंत्रज्ञानाच्या टेस्टिंगसाठी तयार आहे आणि 5G तंत्रज्ञानाच्या यशस्वी चाचणीनंतर आता रिलायन्स तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर भर देणार आहे.
भारतात आतापर्यंत 5G तंत्रज्ञानाच्या टेस्टिंगसाठी स्पेक्ट्रम उपलब्ध झालेलं नाही. परंतु, अमेरिकेत रिलायन्स जियोचं 5G तंत्रज्ञानाचं यशस्वी परिक्षण करण्यात आलं आहे. तंत्रज्ञानाने सर्वच मापदंडांवर उत्तम कामगिरी केली आहे. क्वालकॉमचे वरिष्ठ उपाध्यक्ष, दुर्गा मल्लदी यांनी यांनी सांगितलं की, आम्ही जिओसोबत एकत्र मिळून अनेक तंत्रज्ञान विकसित करत आहोत.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांनी चिनी कंपनी हुवावेवर बंदी घातली आहे. हुवावे 5G तंत्रज्ञान विकसित करणारी चिनी कंपनी आहे. 5G तंत्रज्ञानाच्या यशस्वी परीक्षणानंतर आता रिलायन्स जिओ जगभरात चिनी कंपनीची जागा घेऊ शकतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा