भाजपाच्या वतीने वैभववाडीतील महिला बचत गटांना मोफत खत वितरण
वैभववाडी भाजपा कार्यालयात बचत गटातील महिला प्रतिनिधींना खत वितरण करताना नासीर काझी, जयेंद्र रावराणे, शारदा कांबळे, अक्षता डाफळे व इतर पदाधिकारी.

भाजपाच्या वतीने वैभववाडीतील महिला बचत गटांना मोफत खत वितरण

भाजपा व आ. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून तालुक्यात हळद क्रांती उपक्रम. भाजपाच्यावतीने सिंधू आत्मनिर्भर अभियानांतर्गत हळद लागवड केलेल्या वैभववाडीतील महिला बचत गटांना मोफत खताचे वाटप करण्यात आले. येथील तालुका भाजपा पक्ष कार्यालयात खत वितरण कार्यक्रम सोमवारी पार पडला. यावेळी मंडळ अध्यक्ष नासीर काझी, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, पं. स. सभापती अक्षता डाफळे, उपसभापती दुर्वा खानविलकर, पं. स. सदस्य हर्षदा हरयाण, माजी सभापती बाळा हरयाण, स्नेहलता चोरगे, शुभांगी पवार, प्राची तावडे, दाजी पाटणकर, प्रदीप नारकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

वैभववाडी तालुक्यातील 125 महिला बचत गटांना जून महिन्यात जवळपास एक टन हळद बी चे वाटप करण्यात आले होते. बचत गटांनी लागवड केलेल्या हळदीला मोफत खतही भाजपा मार्फत पुरविण्यात आले आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची ‘हळद क्रांती’ अशी तालुक्यात चर्चा होत आहे. खत वितरण कार्यक्रम प्रसंगी नासीर काझी यांनी बचत गटातील महिला प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “तालुक्यातील प्रत्येक महिला बचत गट आर्थिक सक्षम व्हावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हळद शेती करणाऱ्या बचत गटांना कृषी तज्ज्ञांकडून वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून बचत गटांनी आधुनिक शेतीची कास धरत प्रगती साधली पाहिजे.”

लागवड केलेल्या हळद शेती समवेत बचत गटातील महिलांनी सेल्फी घ्यावा. तो सेल्फी फोटो भाजपा कार्यालय प्रमुख अनंत फोंडके 9403297032 या नंबर वरती पाठवावा असे आवाहन अध्यक्ष नासीर काझी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा