You are currently viewing ज्ञानदीपचे कार्य प्रेरणादायी, इतरांनी आदर्श घ्यावा

ज्ञानदीपचे कार्य प्रेरणादायी, इतरांनी आदर्श घ्यावा

*गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर*

 

*ज्ञानदीप शिक्षण मंडळ पुरस्कार सोहळा थाटात संपन्न*

 

सावंतवाडी :

तब्बल सतरा वर्ष अविरत आदर्श व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या ज्ञानदीप मंडळाचा खरोखरचं इतर सामाजिक संस्थांनी आदर्श घ्यावा, असे प्रेरणादायी कार्य ज्ञानदीपचे आहे. आज पुरस्कार मिळवणाऱ्यांमध्ये सर्वाधिक शिक्षक आहेत. ज्ञानदीप मंडळाच्या या अभिनव उपक्रमात माझ्यासारख्या एका शिक्षकाकडून सेवाव्रत्ती शिक्षकांचा गौरव झाला, त्यामुळे मी स्वतःला सुद्धा भाग्यवान समजतो, असे गौरवोद्गार गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सावंतवाडीत केले. सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कूलच्या सभागृहात ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्या जिल्हास्तरीय ज्ञानदीप पुरस्कारांचे वितरण दिमाखदारपणे संपन्न झाले. यावेळी उद्घाटक म्हणून गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे – परब, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. ॲड. अरुण पणदूरकर, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व युवा उद्योजक शैलेश पै, सैनिक पतसंस्थेचे माजी चेअरमन शिवराम जोशी, कळसुलकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठस्कर, केंद्रप्रमुख म. ल. देसाई, ज्ञानदीप शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक. अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, कार्याध्यक्ष निलेश पारकर, खजिनदार एस. आर. मांगले, सहसचिव विनायक गांवस, माजी मुख्याध्यापक व्ही. टी. देवण, कळसुलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. पी. मानकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, मळगाव हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका श्रद्धा सावंत, नवीन शैक्षणिक धोरणाचे राज्य सुकाणू समितीचे सदस्य भरत गावडे, एस. जी. साळगावकर आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री पार्सेकर पुढे म्हणाले, गोवा आणि सिंधुदुर्ग यांचं रोटी-बेटीचं नातं आहे. मला अभिमान आहे की मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जावई आहे. मी पुन्हा मुख्यमंत्री होईल पण त्यासाठी माझा माजी मुख्यमंत्री हा उल्लेख न होता, शिक्षक म्हणून उल्लेख व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक म्हणाले, ज्ञानदीप म्हणजे समाजातील चांगुलपणा आणि निरपेक्ष झटणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना शोधणारा एक संस्कारी परिवार आहे. ज्ञानदीप मंडळाच्या प्रत्येक शिलेदारांना राज्यस्तरावर गौरविले जाते, याचा अभिमान ज्ञानदीपला आहे. 17 वर्षाच्या प्रवासात अनेक अडथळे अनेक वादळे पेलून ज्ञानदीप घट्टपणे उभा राहिला, यामागे ज्ञानदीपच्या टीमचे फार मोठे संघर्ष आहेत. आपल्या कार्यक्रमात अनेकांना गौरविले जाते, म्हणून याचा सार्थ अभिमान ज्ञानदीपला नेहमीच आहे आणि तो राहील, अशी अपेक्षा श्री. नाईक यांनी व्यक्त केली.

प्रमुख अतिथी कोकण महिला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष अर्चना घारे म्हणाल्या, खरोखरच ज्ञानदीप मंडळाने आयोजित केलेला कार्यक्रम हा एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. समाजाच्या सर्व स्तरावर काम करणाऱ्या गुणवंतांचा ज्ञानदीप सन्मान करते आणि आमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अशा लोकांची ओळख करून देते, हे फार मोठे कार्य ज्ञानदीप करीत आहे. १७ वर्ष अविरत असं कार्य ज्ञानदीप करत आहे. या संस्थेत अधिक शिक्षक आहेत. शिक्षक हे समाज घडवत असतात. तर या समाजात प्रेरणादायी कार्य करणाऱ्यांचा सन्मान ज्ञानदीप मंडळ करत आहे. असे सांगत त्यांनी ज्ञानदीपला शुभेच्छा देऊन कौतुकही केले.

अध्यक्षीय भाषणात प्रा. ॲड. अरुण पणदूरकर म्हणाले की, ज्ञानदीप हा सतत तेवणारा असतो. त्याचप्रमाणे ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे कार्य सुरू आहे. नव्या पिढीवर संस्कार करायला शिक्षक म्हणून आपण कुठं चुकतोय का? याचा विचार करायची वेळ आली आहे, असे प्रकार समाजात घडत आहेत. या समाजाला सुधारण्यासाठी शिक्षकांनं प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर, प्रा.सुरेश म्हसकर, उद्योजक व कवी दीपक पटेकर, कवी विठ्ठल कदम, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी पांडुरंग काकतकर, सोनुर्ली हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक प्रदीप सावंत, आदर्श शिक्षक दत्ताराम सावंत, सेवानिवृत्त शिक्षक शंकर प्रभू, वैभव केंकरे, श्रद्धा सावंत, अनिल ठाकूर, एस. पी. कुळकर्णी, एस. व्ही.भुरे, सुनील नेवगी अनिल कांबळे, कला शिक्षक हंसराज गवळी, रमेश काकतकर(बेळगाव) आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रूपेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सहसचिव विनायक गांवस यांनी मानले.

 

या गुणवंतांचा झाला सन्मान…

सौ.सीमा पंडित (सावंतवाडी), प्रा.संतोष जोईल (फोंडाघाट), पांडुरंग दळवी (वजराट ता . वेंगुर्ले) , निलेश मोरजकर (बांदा), प्रकाश कानूरकर (कट्टा -मालवण), उत्तम फोंडेकर (कुंभारमाठ ता. मालवण) या उपक्रमशील व्यक्तिंना ज्ञानदीप शैक्षणिक मंडळातर्फे सन्मान चिन्ह शाल, श्रीफळ, गौरवपत्र, देऊन सन्मानित करण्यात आले.

 

विशेष सन्मान –

दरम्यान यावेळी ज्ञानदीप मंडळांतर्फे मुख्याध्यापक प्रदीप सावंत यांचा शालेय पदविका अभ्यासक्रमात कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै केंद्रात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल व माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर यांचा विशेष योगदानाबद्दल माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 

 

*संवाद मिडिया*

 

*आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…! ‘स्वार बिल्डकॉन’ च्या खास ऑफरसह..*🏬

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏢आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…!😇*

 

*🌄प्रशस्त जागेत पहिल्यांदाच !*

 

*💁🏻‍♀️🏩बुक करा हक्काचा फ्लॅट…!🏬💁🏻‍♂️*

 

*’स्वार बिल्डकॉन’* घेऊन आलंय *2BHK* प्रशस्त फ्लॅटची 8 मजली इमारत !

 

*😍’स्वार बिल्डकॉन’ची* फ्लॅट बुकिंगवर खास ऑफर !😍

 

फ्लॅट खरेदीवर *50″ इंची LED टीव्ही🖥️,* *टू* व्हीलर🛵 & *फोर* व्हीलर 🚗 *पार्किंग* अगदी *FREE🥳*

 

♦️ *आमची वैशिष्ट्ये*

▪️संपूर्ण चिऱ्याचे बांधकाम

▪️8 मजली इमारत

▪️कव्हर टेरेस

▪️2 जनरेटर बॅकअप लिफ्ट

▪️प्रशस्त लॉबी

▪️24 तास पाण्याची सोय

▪️सीसीटीव्ही एरिया

▪️ओपन जीम

▪️अग्निसुरक्षा सिस्टीम

▪️सेपरेट टू/फोर व्हीलर पार्किंग

 

👉 *🏪विक्रीसाठी कमर्शियल शॉप उपलब्ध !*

 

👉 300 ते 600 sq.ft पर्यंतचे रोड टच दुकान गाळे उपलब्ध

 

*मग, वाट कसली बघताय ?*

 

सावंतवाडी ITI समोर मुंबई-गोवा महामार्ग व नियोजित रिंगरोडसमोरील अलिशान प्रोजेक्टला बुक करा तुमच्या *हक्काचा फ्लॅट / कमर्शियल शॉप !*📝

 

👉 *💵बुकिंग रक्कम फक्त 1 लाख..*

 

▪️ऑफर फक्त 31 ऑक्टोबर पर्यंत.

 

🎴 *पत्ता : आयटीआय समोर हॉटेल सागर पंजाब शेजारी, सावंतवाडी*

 

📱 *संपर्क : डाॅ. अनिश स्वार*

9730353333

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा