You are currently viewing आमदार नितेश राणे यांच्या मागणी नुसार विधिमंडळात आज कृषी मंत्रालयाची बैठक

आमदार नितेश राणे यांच्या मागणी नुसार विधिमंडळात आज कृषी मंत्रालयाची बैठक

*आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या होणार मान्य

*आमदार नितेश राणेंच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे कृषिमंत्र्यांनी लावली बैठक

*पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातच आमदार नितेश राणे यांनी केली होती मागणी

कणकवली

आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत सातत्यपूर्ण मागणी केल्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज शुक्रवार २८ रोजी दुपारी दोन वाजता विधिमंडळात बैठकीचे आयोजन केले आहे. विधान परिषदेच्या सभापती यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हासह कोकणातील आंबा काजू व अन्य पिकांचे होणारे नुकसान, त्याचबरोबर बदललेल्या वातावरणामुळे आंबा काजूचे पीक येत नाही. आलेल्या पिकाला फळमाशीचा प्रादुर्भाव होतो व नुकसान होते याबाबत सरकारने ठोस भूमिका घ्यावी. व कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली होती. या संदर्भात विचार विनिमय आणि निर्णय घेण्यासाठी अधिकारी ,लोकप्रतिनिधी आणि मंत्री महोदय अशी संयुक्त बैठक घेतली जावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली होती. त्यानुसार ही बैठक आज घेतली जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा