You are currently viewing २ ते ४ नोव्हेंबर राज्यातील सर्व रासायनिक खते, बी-बियाणे, कीटकनाशक विक्रेते बंद पाळणार

२ ते ४ नोव्हेंबर राज्यातील सर्व रासायनिक खते, बी-बियाणे, कीटकनाशक विक्रेते बंद पाळणार

देवगड:

 

विक्री करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सध्या पुरेसे कायदा असताना राज्य शासनाने नवीन विधेयक आणले आहे. त्यातील जाचक अटींमुळे कृषी निविष्ठा विक्री करणेही मुश्कील आहे. त्यामुळे संभाव्य विधेयकाविरोधात आवाज उठवण्यासाठी २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील सर्व रासायनिक खते, बी-बियाणे, कीटकनाशक विक्रेते बंद पाळणार आहेत. अशी माहिती सुजल अग्रो केअरचे मालक जयवंत गोसावी यांनी दिली आहे.

श्री गोसावी म्हणाले, “राज्यातील खते व औषधे विक्रेते तयार करीत नाहीत. विविध कंपन्यांनी तयार केलेल्या उत्पादनांचे सील बंद पॅकेट ते विकतात. त्या पाकिटामधून संबंधित कंपनीने सदोष उत्पादन घातले असेल किंवा अनावधनाने काही दूषित घटक मिश्रित झाले असतील तर त्याबाबत विक्रेत्यांना दोषी ठरवणे योग्य होणार नाही तसेच झाल्यास कायदेशीर कारवाई संदर्भात प्रचलीत कायदे आहेत. तरीही राज्य शासनाने नवीन विधेयक आणत आहे. त्यात विक्रेत्यांना सरसकट दोषी धरण्यात येणार आहे. त्यासाठी निविष्ठा विक्रेत्यावर अजामीन पात्र गुन्हा नोंद होऊ शकतो. तसेच तीन महिने त्याला तुरुंगात बसावे लागेल, अशी तरतूद आहे. तसेच पोलिस यंत्रणेलाही कारवाईचे का आदेश दिले आहे. स्थानिक पातळीवर एखाद्या वादातून एखाद्या विक्रेत्यांना कायद्याच्या चौकटीत अडविण्याचा धोका आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − eighteen =