You are currently viewing मालवणमधील रामेश्वर – नारायण पालखी सोहळा १४ रोजी

मालवणमधील रामेश्वर – नारायण पालखी सोहळा १४ रोजी

मालवणमधील रामेश्वर – नारायण पालखी सोहळा १४ रोजी

मालवण

मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांचा वार्षिक पालखी परिक्रमणा सोहळा मंगळवार दि. १४ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.

या पालखी सोहळ्यात दुपारी १ वाजता मालवण देऊळवाडा येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथून पालखी निघून श्री देव नारायण, श्री देवी पावणाई, श्री देवी भावई, श्री देवी सातेरी या सर्व देवतांना सांगणे करुन आडवण मार्गे वायरी तानाजी नाका, श्री देव भूतनाथ मंदिर, वायरी येथे थांबून समुद्र मार्गे मोरेश्वर (मोरयाचा धोंडा) येथे थांबेल. त्यानंतर दांडी येथील दांडेश्वर मंदिरात भेट देऊन मेढा येथील श्री देवी काळबादेवी मंदिर येथे भेट देऊन जोशी मांड, मेढा येथे पालखी थांबेल. त्यानंतर मालवण बंदर जेटी येथून पालखी सोमवार पेठेत दाखल होऊन श्री देव रामेश्वर मांड येथे भाविकांना दर्शनासाठी थांबेल. त्यानंतर रात्री उशिरा बाजारपेठ -भरड मार्गे पुन्हा देऊळवाडा येथे मंदिरात पालखी येईल. तरी या पालखी सोहळ्यात सर्व भाविकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रामेश्वर, नारायण, सातेरी इ. देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*☘️ ही दिवाळी साजरी करा सुरक्षित ह्युंदाई कार्स सोबत…!!*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙*

💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा