You are currently viewing सुशिक्षित जनतेचा महा विकास आघाडीला कौल शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर

सुशिक्षित जनतेचा महा विकास आघाडीला कौल शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर

काल झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणूकीत महाराष्ट्रातील शिक्षक व पदवीधर मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मोठा कौल दिलेला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील सुशिक्षित जनतेकडून सरकारला मिळालेली ही पोच पावतीच आहे.
कोरोना सारख्या संकटाच्या काळात सत्ता मिळवण्यासाठी खालच्या थराचे राजकारण करणार्या भाजपचा पार फज्जा उडालेला आहे.
सातत्याने महाराष्ट्र द्वेषी राजकारण करणार्या भाजपला ही मोठीच चपराक आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + nineteen =