You are currently viewing खा. विनायक राऊत यांच्या शिफारशीमुळे रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश

खा. विनायक राऊत यांच्या शिफारशीमुळे रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश

*दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना दिलासा*

रत्नागिरी:

दिव्यांगांनी व जेष्ठ नागरिकांनी सहाय्यभूत साधनांसाठी आपले सरकार सेवा केंद्रात किंवा ग्रामपंचायत मध्ये जाऊन ऑनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले.

देशातील 55 जिल्ह्यामध्ये खासदार विनायक राऊत यांच्या शिफारशीने रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालया कडुन एडीप व वयोश्री योजने अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांगांना व निराधार जेष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साधने,उपकरणे मिळण्यासाठी  खासदार विनायक राऊत यांनी लेखी मागणी केल्या नंतर देशातील 55 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यात रत्नागिरी चा समावेश करण्यात आला. ज्यात जिल्ह्यातील 40% च्या वर अपंगत्व असलेले व ज्यांना सहाय्यभूत उपकरणांची गरज आहे असे दिव्यांग व 60 वर्षा वरील जेष्ठ नागरिक ऑनलाईन नोंदणी करू शकणार आहेत. यामध्ये भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अर्थात Alimco अलीम्को यांच्या कडील साहित्य ( अस्थिव्यांगाकरिता काठ्या, कुबड्या, व्हीलचेअर, कृत्रिम अवयव,तीन चाकी सायकल, अंधाकरिता अंध काठी, डेझीप्लेअर, मोबाईल, स्मार्ट केन जेष्ठ नागरिकांकरिता चष्मा, वॉकर, दाताची कवळी, श्रवणयंत्र, वेगवेगळ्या काठ्या, व्हिलचेअर, कर्णबधिरांसाठी श्रवणयंत्र, 18 वर्षाखालील मतीमंदांसाठी एम आर कीट, सेरेब्रल पाल्सी यांच्यासाठी सी.पी.चेअर) वितरीत केले जाणार आहे. त्यासाठी दिव्यांगांनी व आर्थिक दृष्ट्या मागास जेष्ठ नागरिकांनी जवळच्या “आपले सरकार सेवा केंद्र” अर्थात CSC मध्ये किंवा ग्रामपंचायतमधील आपले सरकार सेवा केंद्र (CSC) मध्ये जाऊन online फॉर्म भरणे आवश्यक आहे.

सदर online form भरणेसाठी

१) दिव्यांग प्रमाणपत्र छायांकित प्रत

२) उत्पन्न दाखला छायांकित प्रत

३) पासपोर्ट size फोटो एक

४) size कार्ड छायांकित प्रत

५) स्वाक्षरी (सही)

या नाव नोंदणी साठी कोणतेही शुल्क केंद्र चालकाकडुन आकारले जाणार नाही. नाव नोंदणी मोफत आहे. ज्या दिव्यांगांनी मागील एक वर्षात कोणत्याही यंत्रणे कडुन सहाय्य भुत साधनांचा लाभ घेतला नसलेले दिव्यांग व जेष्ठ नागरिक पात्र ठरतील. त्यामुळे 30 मार्च पर्यंत गरजूंनी ऑनलाईन नाव नोंदणी करावी असे आवाहन  खासदार  विनायक राऊत व आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी च्या वतीने श्रीम. सुरेखा पाथरे व आस्था दिव्यांग हेल्पलाईन च्या वतीने संकेत चाळके यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + four =