सावंतवाडी :
११ नोव्हेंबरला बांद्यातील आमची वाडी-देऊळवाडी तर्फे नरक चतुर्दशी निमित्त भव्य आंतरराज्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८ ते १० या वेळेत बांदा येथील बांदेश्वर मंदिर येथे हि स्पर्धा संपन्न होणार आहे. नरकासुर स्पर्धे दरम्यान अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील प्रथम पारितोषिक १० हजार, द्वितीय पारितोषिक ५ हजार, तृतीय पारितोषिक २ हजार, चतुर्थ व पाचवे पारितोषिक प्रत्येकी १ हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा विनामूल्य असून अधिक माहितीसाठी अक्षय मयेकर ९५०३८७१९२४ किंवा संकेत वेंगुर्लेकर ९०१११०७५६२ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन स्पर्धेचे संयोजक सागर सावंत यांनी केले आहे.