You are currently viewing “साहित्यिकांनी जबाबदारीने लिहावे!” – पद्मश्री गिरीश प्रभुणे

“साहित्यिकांनी जबाबदारीने लिहावे!” – पद्मश्री गिरीश प्रभुणे

*”साहित्यिकांनी जबाबदारीने लिहावे!” – पद्मश्री गिरीश प्रभुणे*

पिंपरी

“समाजमाध्यमांवर केलेले लेखन हे जागतिक पातळीवर जाऊन पोहोचते. त्यामुळे साहित्यिकांनी दर्जेदार, आशयसंपन्न आणि जबाबदारीने लिहावे!” असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे सोमवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी केले. दिलासा साहित्य सेवा संघ आयोजित लेखक सन्मान सोहळ्यात दिलासा या व्हॉट्सअॅप समूहावर वर्षभर नियमितपणे लेखन करणाऱ्या लेखकांचा गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तर ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी, प्रकाशक नितीन हिरवे आणि दिलासा साहित्य सेवा संघाचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. तसेच चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, राजाराम गावडे, पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समन्वयक सुहास पोफळे, नीलेश शेंबेकर, रामचंद्र प्रधान यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

याप्रसंगी अशोकमहाराज गोरे, कैलास भैरट, तानाजी एकोंडे, डॉ. पी. एस. आगरवाल, नारायण कुंभार, श्रीकांत चौगुले, वर्षा बालगोपाल, रघुनाथ पाटील, आनंद मुळूक, हेमंत जोशी, शामला पंडित, जयश्री गोवंडे, संगीता सलवाजी, राधाबाई वाघमारे यांना शाल आणि ग्रंथ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, ज्येष्ठ कवी आय. के. शेख आणि वाचक प्रतिनिधी राजेंद्र भागवत यांच्या हस्ते दुर्गादेवीची आरती करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. दिलासा साहित्य सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी प्रास्ताविकातून, “करोनाकाळात सर्व जनव्यवहार ठप्प झाले होते. तेव्हा ‘दिलासा’ या व्हॉट्सअॅप समूहाच्या माध्यमातून आठवडाभर दररोज वेगवेगळ्या विषयांवर स्वतःचे लेखन करण्याची जबाबदारी स्वीकारावी असा प्रस्ताव ठेवला. त्याला तीन वर्षांपासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे!” अशी माहिती दिली. सन्मानार्थींच्या वतीने श्रीकांत चौगुले यांनी, “सदरलेखनातूनच अनेक प्रथितयश लेखकांची ग्रंथसंपदा निर्माण झाली. त्यामुळे नियमितपणे लेखनाचे महत्त्व खूप मोठे आहे!” असे मत मांडले. नितीन हिरवे यांनी शुभेच्छा दिल्या; तर शोभा जोशी यांनी कविता सादर केली. नंदकुमार मुरडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून रूपककथा आणि ‘उपक्रम’ या लेखाचे अभिवाचन केले.

मुरलीधर दळवी, प्रतिभा कुंभार आणि दिलासाच्या सदस्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. शामराव सरकाळे यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा