You are currently viewing सुकळवाड (ता.मालवण) येथे भातपीक पहाणी कार्यक्रम

सुकळवाड (ता.मालवण) येथे भातपीक पहाणी कार्यक्रम

*कावेरी सिड्स आणि एस.के. कृषी सेवा केंद्राचा उपक्रम*

 

मालवण:

 

कावेरी सीड्स प्रा. लि. आणि एस. के.कृषी सेवा केंद्र सुकळवाड यांच्यामार्फत शेतकऱ्यांसाठी भात पिक पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी १७ ऑक्टोंबरला सकाळी साडेदहा वाजता सुकळवाड येथील ब्राह्मणदेव मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार आणि लकी ड्रॉ सिस्टीम ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमाला कावेरी सीड्स प्रा. लि. चे मॅनेजर पवार, मालवण पं. स. कृषी अधिकारी, जिल्ह्यातील भात बियाणे अधिकृत विक्रेते, सरपंच, ग्रामस्थ उपस्थित राहणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कावेरी सीड्स प्रा. लि. आणि एस के कृषी सेवा केंद्र सुकळवाड यांच्याकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 18 =