You are currently viewing मसुरे येथे जागतिक आपत्ती धोका निवारण दिन संपन्न

मसुरे येथे जागतिक आपत्ती धोका निवारण दिन संपन्न

मसुरे :

प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून योग्य ती काळजी घेतल्यास कोणत्याही आपत्ती वरती मात करता येते तसेच आपत्ती आल्यानंतर सर्वांनी स्वतः बरोबर दुसऱ्याची ही काळजी घेणे गरजेचे असते कोणत्याही आपत्तीत डगमगून न जाता शांतपणे प्रशासनाच्या तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे प्रशासन तुमच्या नेहमीच पाठीशी राहील असे प्रतिपादन सुहास चव्हाण यांनी मसूरे येथे बोलताना केले.

मसुरे मर्डे ग्रामसचिवालय येथे जागतिक आपत्ती धोके निवारण दिन मसुरे मंडल अधिकारी सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

यावेळी आपदा मित्र सौ प्रज्ञा बागवे, आपदा मित्र ऐश्वर्या घडीगावकर, तलाठी एस पी लखमोड, पोलीस पाटील प्रेरणा येसजी, तलाठी वाय बी राजुरकर, कोतवाल सचिन चव्हाण, संतोष चव्हाण, जिल्हा परिषद शिक्षक विनोद सातार्डेकर, नवनाथ गोसावी, बाबू येसजी, गिरकर मॅडम, शैलेश मसुरकर, विनोद मोरे,सुदर्शन मसुरकर, मानसी पेडणेकर, श्रेया मगर, चैतन्य भोगले, समर्थ दुखंडे, नेहा शिंगरे, आयुष दूखंडे, यशस्वी कातवणकर, मोक्षता कातवणकर, स्नेहा मसुरकर, रिया भोगले आणि

अंगणवाडी सेविका आरोग्य सेवक जिल्हा परिषद शिक्षक विद्यार्थी महसूल कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन वाय बी राजूरकर यांनी केले. यावेळी आपला मित्र प्रज्ञा बागवे, ऐश्वर्या घाडीगावकर यांनी आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यानंतर कोणत्या उपयोजना कराव्या आणि त्याला कसे सामोरे जावे याबाबत माहिती दिली. तसेच विनोद सातार्डेकर यांनीही आपत्कालीन परिस्थितीत सामोरे जाताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी याबद्दल प्रात्यक्षिकांसहित माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा