You are currently viewing दिपक केसरकर यांना धडकी भरवणारा सावंतवाडीतील राष्ट्रवादीचा मेळावा..

दिपक केसरकर यांना धडकी भरवणारा सावंतवाडीतील राष्ट्रवादीचा मेळावा..

अर्चना घारे परब यांचे आयोजन; महिलांची उपस्थिती लक्षणीय

 

सावंतवाडी :

 

आज सावंतवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी व कार्यकर्ता मेळावा पार पडला. माजी मंत्री तथा आमदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यकर्त्या मेळाव्यात अर्चना घारेंनी आपली ताकद दाखवून दिली.

लाभाचे पद नसतांना सावंतवाडी मतदारसंघात राष्ट्रवादी वाढविण्याचे आम्ही काम करत आहे. येणाऱ्या काळात चोवीस तास काम करुन अजून राष्ट्रवादी वाढविण्याची तयारी ठेऊ फक्त वरिष्ठांनी पाढ बळ आणि आदर्शवाद द्या अशी मागणी कोकण विभागीय महीला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी केले.

दरम्यान विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षात गेले की त्यांच्यावर कितीही भ्रष्टाचारांचे आरोप असले तरी ते वॉशिंग मशीन सारखे धुन निघतात असा आरोप देखील अर्चना घरी परब यांनी आज येथे केला.

यावेळी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संदीप गवस यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून अर्चना घारेंना उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाला असलेला पक्ष तळाला पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांच्या गर्दीने सभागृह खचाखच भरून दाखवत अर्चना घारेंनी आपली ताकद दाखवली. नुकत्याच झालेल्या पक्षफुटी नंतर सिंधुदुर्ग जिल्हा व सावंतवाडी मतदारसंघ शरद पवार यांच्यासोबत असल्याचं अर्चना घारेंनी दाखवून दिलं. तर राष्ट्रवादी संपली असं म्हणणाऱ्या अर्चना घारेंनी मेळाव्यातून उत्तर दिल्याचे मत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं.

यावेळी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, निरीक्षक शेखर माने, व्हिक्टर डान्टस, रेवती राणे, प्रसाद रेगे, पुंडलिक दळवी, अनंत पिळणकर, भास्कर परब आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा