सावंतवाडी :
महाराष्ट्र व गाेवा राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या, सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व ३६५ खेडयांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा साेहळा गुरुवार ६ फेब्रुवारी २०२५ राेजी साजरा हाेणार आहे.
सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी माेठा उत्सव म्हणून साजरा हाेताे. यावर्षीही त्या निमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. गुरुवार ६ फेब्रुवारी राेजी सकाळी अभिषेक व पूजा, उत्सवानिमित्त पूजापाठ, त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन व तिर्थप्रसाद,नामांकीत भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम हाेणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता सावंतवाडी येथील महापुरुष दशावतार नाटयमंडळाचा नाटयप्रयाेग हाेणार आहे. या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव उपरलकर देवस्थानचे मानकरी विद्याधर नाईक शितप व शुभम नाईक शितप यांनी केले आहे.