You are currently viewing 17 ऑक्टोंबर 2023 रोजी बहुजनांचे कैवारी धनगर समाजाचे बुलंद आवाज महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांचा “धनगर जागर यात्रा” निमित्त सिंधुदुर्ग नगरीत हेलिकॉप्टरने होणारा आगमन

17 ऑक्टोंबर 2023 रोजी बहुजनांचे कैवारी धनगर समाजाचे बुलंद आवाज महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांचा “धनगर जागर यात्रा” निमित्त सिंधुदुर्ग नगरीत हेलिकॉप्टरने होणारा आगमन

*17 ऑक्टोंबर 2023 रोजी बहुजनांचे कैवारी धनगर समाजाचे बुलंद आवाज महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांचा “धनगर जागर यात्रा” निमित्त सिंधुदुर्ग नगरीत हेलिकॉप्टरने होणारा आगमन*

*कोणत्याही पक्षाचा झेंडा,सामाजिक संघटनेचा झेंडा न वापरता सकल धनगर समाज व भटके विमुक्त जाती जमाती सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यात होणार धनगर जागर यात्रा*

*समाज बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे जिल्हा दौरा प्रमुख नवलराज विजयसिंह काळे यांचे आवाहन*

*सिंधुदूर्गनगरी-*
बहुजनांचे कैवारी धनगर समाजाचा बुलंद आवाज महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हेलिकॉप्टर दौऱ्याच्या नियोजनाबाबत व आमदार गोपीचंद पडळकर व महाराष्ट्र राज्य दौरा प्रमुख शिवदास बिडगर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या *धनगर जागर यात्रे* बाबत 10 ऑक्टोबर 2023 रोजी आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा मध्यवर्ती बँक कार्यालयाच्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या हॉलमध्ये बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले.
या बैठकीला नवलराज काळे, शांताराम उर्फ बाळा गोसावी, संतोष साळस्कर, अमोल जंगले, सुरेश झोरे, मयूर चव्हाण,राजेश जानकर,सुशील खरात,रामचंद्र मसूरकर,प्रथमेश निकम,गुरुनाथ बबनआळे, व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलत असताना नवलराज काळे यांनी बैठकीबाबतचे नियोजन कसे असेल याबाबत माहिती दिली.
*कार्यक्रमाची रूपरेषा*
17 ऑक्टोबर 2023 रोजी
_सकाळी 11.00 ते 12.00 समाज बांधवांची प्रवेश नोंदणी व चहा नाष्टा
_12.00 – वाजता आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे हेलिकॉप्टरने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन
_12.15 वाजता नियोजित बैठकीच्या ठिकाणी आगमन झाल्यावर उपस्थित महिला मंडळींच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे औक्षण
_छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज पुण्यश्लोक, आहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन
_आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा घोंगडी फेटा श्रीफळ व धनगरी काठी देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने जाहीर सत्कार व उपस्थित मान्यवर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार स्वागत.
_कार्यक्रमाची प्रास्तावना
_उपस्थित मान्यवरांचे भाषण
*_आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे लाख मोलाचे मार्गदर्शन*
_कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाषण
_दुपारी 02.30 ते 03.00 स्नेहभोजनाचा कार्यक्रम
धनगर समाजातील व भटके विमुक्त जाती जमाती मधील जागृत नेतृत्व यांनी समाज बांधवांची उपस्थिती वाढवण्याकरिता केले आवाहन.समाज नेतृत्वाने आप आपल्या तालुक्यातील समाज बांधवांना कार्यक्रम स्थळी मोठ्या संख्येने समाज बंधू-भगिनी उपस्थित करण्याकरिता तालुकास्तरीय बैठका लावून नियोजन करावे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटी देऊन, मोबाईल फोनवरून आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या बैठकीचे निमंत्रण द्यावे. धनगर जागर यात्रा या बैठकीत ना कोणत्या पक्षाचा बॅनर, ना कोणत्या पक्षाचा झेंडा,ना कोणत्या संघटनेचा बॅनर फक्त सकल धनगर समाज व भटके विमुक्त जाती जमाती मधील समाज बंधू भगिनींच्या उपस्थितीत ही धनगर जागर यात्रा संपन्न होणार आहे असून महाराष्ट्र राज्यातील बहुजनांमधील विधान परिषद सभागृहातील धनगर समाजाचा एकमेव बुलंद आवाज
आमदार पडळकर साहेब हेलिकॉप्टरने सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. हा दौरा यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावे.
सदर दौरा हा राजकीय नसून सामाजिक दौरा आहे याची सर्व समाज बांधवांनी नोंद घ्यावी.
या बैठकीत कुठेही कोणत्याही पक्षाचा झेंडा वापरला जाणार नाही किंवा उपस्थित असणाऱ्या समाजाला कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधले जाणार नाही याची खात्री आणि हमी नवलराज काळे यांनी समाज बांधवांना आहे.
तुम्ही कुठल्या पक्षाचे काम करायचं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे परंतु आपल्या समाजातील महाराष्ट्र राज्यातील एकमेव आमदार आपल्या जिल्ह्यात येत आहे त्यांचे मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वागत करणे धनगर समाज व भटके विमुक्त जाती जमाती मधील समाज म्हणून आपलं सर्वात प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे मनात कोणतीही शंका न बाळगता आपण समाज बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नवलराज काळे यांनी समाज बंधू-भगिनी यांना केले आहे.सदर बैठकी दरम्यान समाज संघटना, समाज बंधू-भगिनींना व गोपीचंद पडळकर साहेब यांच्या हितचिंतकांना विकास कामांबाबत काही निवेदने द्यावयाचे असल्यास लेखी स्वरूपात असलेले निवेदन आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडे सुपूर्त करून त्यांचे स्वीय सहायक आबासाहेब कोकरे यांच्याकडून पोच घ्यावी.

*संवाद मीडिया*

सादर करीत आहोत
🇮🇳भारतातील विक्रीचे सर्व उच्चांक मोडलेली🇮🇳

*All New NEXON* _way ahead_
*तुमचे व्यक्तिमत्त्व खुलावेल असे डिझाईन*

💫 सहा एअर बॅग्स युक्त (कॉमन फिचर)
💫आकर्षक एल ई डी लँप
💫 ई – शिफ्टर मल्टि ड्राइव्ह मोड सहित
💫 व्हॉईस कमांड युक्त इलेक्ट्रिक सनरूफ
💫 अत्यंत आकर्षक अंतर्गत सजावट
💫५ स्टार सेफ्टी रेटिंग सहित
💫 डायमंड कट ॲलॉय व्हील
💫 आणि बरेच काही..!!!

*आपण आणि आपले कुटुंबीय सुरक्षित आहात केवळ टाटा कार्स मध्येच…*

आजच टेस्ट ड्राइव्ह,डेमो, एक्सचेंज,१००% ऑन रोड फायनान्स करिता भेट द्या अथवा कॉल करा

*एस.पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली

*7377-959595*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा