You are currently viewing कतरीनामुळे माझ करिअर खराब झालं…

कतरीनामुळे माझ करिअर खराब झालं…

मुंबई :

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने बॉलिवूडला बरेच नवीन चेहरे दिले. सलमान खानने बॉलिवूडमध्ये बऱ्याच अभिनेत्रींना लॉन्च केलं आहे. तसेच काही अभिनेत्री ह्या फ्लॉप ठरल्या परंतु काही अभिनेत्री आता बॉलिवूड मधील टॉपच्या अभिनेत्री आहेत. झरीन खान ते कतरीना कैफला सोनाक्षी सिन्हा पासून बऱ्याच अभिनेत्रींना सलमान खानने बॉलिवूडमध्ये संधी मिळवून दिली.

झरीन खानला देखील चित्रपटसृष्टीत सलमान खानने आणले होते. झरीन खानने ‘वीर’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पर्दापण केले यानंतर ती ‘रेडी’, ‘हाऊसफुल’ आणि ‘हेट स्टोरी 3’ सारख्या बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसली. मात्र, अशा हिट चित्रपटांमध्ये काम करूनही झरीन खान चित्रपटसृष्टीतल्या एका गोष्टीमुळे खूप चिडते कारण झरीन खानची तुलना नेहमीच अभिनेत्री कतरिना कैफसोबत केली जाते.

झरीन खानला तिची तुलना कतरिना कैफसोबत केलेले मुळीच आवडत नाही. तिचे म्हणणे आहे की, कोणत्याही चित्रपट निर्मात्याला तिच्याबरोबर काम करण्याची इच्छा नाही होत, झरीन कतरिनासारखी दिसते आणि एकसारखीच दिसणाऱ्या अभिनेत्रीला निर्माते कास्ट करू इच्छित नाहीत. झरीन खानने याचा खुलासा एनबीटीला दिलेल्या मुलाखतीत केला. झरीन म्हणाली अगोदर लोक मला म्हणायचे की, मी माझ्या आई सारखी दिसते मात्र, मी चित्रपटसृष्टीत आल्यानंतर मला कळल की मी कतरिना कैफसारखी दिसते.

मला कतरिना कैफसारखे दिसण्याचा खूप मोठा फटका बसला आणि बसत देखील आहे. कतरिनामुळे माझं करियर खराब झालं, झरीना म्हणते की, गेली 11 वर्षे चित्रपटसृष्टीत मी कतरिना सारखी दिसते असे म्हणले जाते याचा परिणाम माझ्या कारकिर्दीवर झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 16 =