You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील ‘मनी मुव्हज’ एक प्रभावी सत्र

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील ‘मनी मुव्हज’ एक प्रभावी सत्र

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘ एस्. एस्. जी थिंक टँक्स या कार्यक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारासाठी बँकेचे जीवनावश्यक फायदे कळावे यासाठी ‘ मनी मुव्हज ‘ हे दुसरे सत्र घेण्यात आले. या कार्यक्रमास बँकिंग क्षेत्रात २५ वर्षे अनुभव असलेल्या वंदना करंबळेकर या उत्तम वक्ता लाभल्या. या सत्राच्या सुरुवातीला शाळेचे संचालक श्री. रुजुल व सौ. काश्मिरा पाटणकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत व आर्थिक व्यवहारासाठी योग्य ज्ञान देणाऱ्या वंदना करंबळेकर यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना बँकेत खाते कसे उघडायचे?, एफ्.डी. व इंटरेस्ट म्हणजे काय?, तसेच बॅंकेतील आर्थिक सुरक्षितता याचे महत्त्व सांगितले. त्याचप्रमाणे, बँकेत लॉकरचा होणारा उपयोग व त्याचे फायदे याबद्दल सविस्तर माहिती दिली. आजच्या काळात ए टी एम् चा मोठ्या प्रमाणात होणारा वापर व त्याचे फायदे याबद्दलही मोलाची माहिती दिली.
त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन प्रश्नोत्तरे व चर्चेच्या माध्यमाद्वारे करण्यात आले. व कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतर्फे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांच्या हस्ते वंदना करंबळेकर यांना लहानशी भेट म्हणून वृक्ष देण्यात आले. व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
अशाप्रकारे हे सत्र आर्थिक सुरक्षितता व व्यवहारासाठी महत्त्वाचे आणि प्रभावी ठरले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 9 =