You are currently viewing कणकवली हळवल फाट्यानजीक टेम्पो उलटून झालेल्या अपघातात क्लिनर ठार; चालक पसार

कणकवली हळवल फाट्यानजीक टेम्पो उलटून झालेल्या अपघातात क्लिनर ठार; चालक पसार

कणकवली :

मुंबई – गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. कणकवली नजिक हळवल फाट्यावर रविवारी पहाटे मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात झाला. या अपघातात क्लिनर जागीच ठार झाला. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

आकाश महाजन (रा. कोल्हापूर) हा आपल्या ताब्यातील टेम्पो (क्रमांक एम. एच. ०९ सी.ए १२८२) घेऊन कोल्हापूर येथून गोव्याच्या दिशेने जात होता. हळवल तिठा येथे हा टेम्पो डाव्या बाजूला पलटी झाला. यात क्लीनर शुभम झोंजाळ (रा. कळे, कोल्हापूर) हा जागीच ठार झाला. अपघानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.

तातडीने महामार्ग पोलिस अधिकारी अरुण जाधव यांच्यासह त्यांचे पथक तसेच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने टेम्पो हलवून अडकलेल्या शुभम झोंजाळ याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अपघात घडल्यानंतर चालक आकाश महाजन हा घटनास्थळावरून पळून गेला होता. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − 2 =