You are currently viewing शाॅर्टसर्कीट मुळे सावंतवाडीतील “भाग्यलक्ष्मी एम्पायर” बिल्डिंग मध्ये शाॅर्टसर्कीट मुळे आग

शाॅर्टसर्कीट मुळे सावंतवाडीतील “भाग्यलक्ष्मी एम्पायर” बिल्डिंग मध्ये शाॅर्टसर्कीट मुळे आग

शाॅर्टसर्कीट मुळे सावंतवाडीतील “भाग्यलक्ष्मी एम्पायर” बिल्डिंग मध्ये शाॅर्टसर्कीट मुळे आग

सावंतवाडी

येथील लक्ष्मी नगर परिसरात असलेल्या भाग्यलक्ष्मी एम्पायर या बिल्डिंग मधील वीज मीटरांना शॉर्टसर्किटने आग लागली. त्यामुळे बिल्डिंगमध्ये राहणारी २५ हून अधिक कुटुंबे धुरात अडकली. त्यात एक महिला अत्यवस्थ झाली. ही घटना काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खासकीलवाडा परिसरात घडली. दरम्यान पालिकेचा बंब व नागरिकांनी पुढाकार घेवून धुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे सोशल मीडियाचे पदाधिकारी सचिन पाटकर यांनी दिली. सुदैवाने आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. कोणी जखमी नाही, असे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मीनगर येथे असलेल्या भाग्यलक्ष्मी एम्पायरमध्ये असलेले वीज मीटरांनी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. यावेळी काही क्षणात बिल्डिंगमध्ये पूर्णता धुरांचे लोट पसरले. नेमके काय झाले, याची काहीच कल्पना तेथील रहिवाशांना नव्हती. त्यामुळे आरडाओरड सुरू झाली. अशा परिस्थितीत काही लोकांनी बिल्डिंगच्या तळमजल्यावर आग लागली अशी ओरड केली. त्यामुळे तेथे अडकलेली कुटुंबे टेरेसवर जाऊन राहिली काही वेळाने त्या ठिकाणी पालिकेच्या बंबाला पाचारण करण्यात आले. बंबाचे कर्मचारी अमोल शितोळे व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेतली. त्यानंतर त्यांच्यासह नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यासाठी आली. त्यानंतर टेरेसवर अडकलेल्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी खाली हलवण्यात आले. काही वेळाने धुराचे लोट कमी झाले. दरम्यान या धुरामुळे महिला अत्यवस्थ झाली. तिला सामाजिक बांधिलकी संघटनेचे अध्यक्ष रवी जाधव यांनी अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान राष्ट्रवादीचे पदाधिकारी सचिन पाटकर, सावली पाटकर, डाॅ. प्रवीण कुमार ठाकरे आदी नागरिकांनी त्या ठिकाणी जमून आज विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा