You are currently viewing सिंधुदुर्गनगरी येथे महिला सक्षमीकरण मेळावा संपन्न

सिंधुदुर्गनगरी येथे महिला सक्षमीकरण मेळावा संपन्न

नारीशक्ती वंदन विधेयकामुळे महिलांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा – केंद्रीय मंत्री नारायण राणे

 

सिंधुदुर्गनगरी :

 

सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने महिला सक्षमीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा हजारो महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपले मत व्यक्त केले. “नारीशक्ती वंदन विधेयक आल्यामुळे महिलांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे. विधेयक आल्यामुळे आता महिलांची जबाबदारी वाढली आहे. इच्छाशक्तीला प्रयत्नाची जोड द्या. मोदी साहेबांनी नारी सन्मान म्हणून 33 टक्के महिला आरक्षण विधेयक आणले आहे, त्याचा फायदा घ्याच, खासदार, आमदार व्हा. त्याच त्याचबरोबर उद्योजक बना. महिला सक्षम बनले पाहिजे यासाठी प्रयत्न करा स्वतः आणि इतरांनाही सक्षम करा. आज पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला हे महिला विधेयक मंजूर करता आले नाही. याची जाणीव ठेवा. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन महिलांनी सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत,” असेही त्यांनी सांगितले.

यावेळी नीलम राणे, आमदार नितेश राणे, लोकसभा मतदारसंघ समन्वयक प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजन तेली, संध्या तेरसे, महिला आघाडी प्रमुख श्वेता कोरगावकर, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सरोज परब, डॉ. प्रसाद देवधर आदी उपस्थित होते.

देशात 181 महिलांना खासदारकी मिळणार आहे. आज 140 कोटी लोकसंख्ये मधील महिलांची आर्थिक स्थितीचा विचार होणे गरजेचे आहे. भारत महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत आपला देश पाचव्या क्रमांकावर आहेत. मात्र 2030 साली तिसऱ्या क्रमांकावर नेणार असा विश्वास मोदी साहेबांनी व्यक्त केला आहे.

उद्योग आणि इतर निर्मिती क्षेत्रातील महिला चे स्थान कोणते आहे ते ओळखा असे सांगतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले माझ्या खात्याकडे अनेक प्रकारच्या योजना आहेत विश्वकर्मा योजनेतून कोट्यावधी रुपयाचा निधी मी कुटुंब उभी करण्यासाठी देऊ शकतो. मात्र त्यासाठी तुमचे प्रस्ताव आले पाहिजेत वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग तुम्ही केले पाहिजेत तुमचं कुटुंब उभे करताना आपल्या शेजारची कुटुंबे आणि महिला भगिनींना सक्षम केले पाहिजेत त्यासाठी पुढाकार घ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश तिसऱ्या क्रमांकावर आर्थिक सक्षम करण्याचा जो संकल्प केलेला आहे त्याचा आपण सर्वांनी एक भाग बनवूया असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.

आमदार , खासदार प्रमानेचे वेगवेगळ्या क्षेत्रातील भारतीय नारीची प्रगती व्हावी या स्तुत्य हेतूने हे विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणले. कोणताही जामीन न घेता 3 लाख 15 हाजार चे कर्ज माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून पीएम विश्वकर्मा योजनेतून दिले जात आहे, त्याचा फायदा घ्यावा, असेही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा