You are currently viewing टेलीमेडिसिन केंद्र मार्फत कुपोषण बाबत जनजागृती

टेलीमेडिसिन केंद्र मार्फत कुपोषण बाबत जनजागृती

टेलीमेडिसिन केंद्र मार्फत कुपोषण बाबत जनजागृती

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून दहा आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा

मालवण

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलीमेडिसिन यंत्रणेद्वारे ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याच टेलीमेडिसिन केंद्र मार्फत सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या आरोग्य केंद्रात कुपोषण आठवडा साजरा करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे टेलीमेडिसीन प्रकल्पाचे समन्वयक प्रतीक दुसेजा व सुमित सावंत यांनी दिली आहे.

सप्टेंबर महिना हा कुपोषण महिना म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने सर्व टेलीमेडिसीन सुविधा असलेल्या आरोग्य केंद्रावर कुपोषणाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच गरोदर महिलांची तपासणी करून माहिती घेऊन त्यांना मोफत आवश्यक औषधे उपलब्ध करून दिली. जिल्ह्यातील 512 रुग्णांना याबद्दल माहिती देण्यात आली व आवश्यक ठिकाणी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.कुपोषण निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून राबवण्यात आलेल्या या आठवड्यात सर्व ठिकाणच्या वैद्यकीय अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगले सहकार्य करून हा कुपोषण आठवडा यशस्वी केला.

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या दहा आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी अत्याधुनिक अशा टेली मेडिसिन प्रकल्पाची सुरुवात करून तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपचार करण्याची नाविन्यपूर्ण सुविधा या जिल्ह्यात निर्माण करून दिली. यात जिल्ह्यातील मोरगाव, बांदा,रेडी, निरवडे, माणगाव, पणदुर, चौके, गोळवण, मसुरे, आचरा अशा दहा ठिकाणी ही सुविधा कार्यरत आहे. या व्यतिरिक्त आणखीही काही टेलिमेडीसिन सेंटर सुरू करण्यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील आहेत. अशी माहिती प्रकल्पाचे उपसमन्वयक सुमित सावंत यांनी या पत्रकाद्वारे दिली.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा