उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री पुढच्या आठवड्यात सिंधुदुर्गात – अमित सामंत

उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री पुढच्या आठवड्यात सिंधुदुर्गात – अमित सामंत

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेची करणार पाहणी…

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची पाहणी करण्यासाठी पुढच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत,अशी माहीती सिंधुदूर्ग राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना वाढत आहे.या पार्श्वभूमीवर या ठिकाणी डॉक्टरांची टास्क फोर्स आणण्याची मागणी होत आहे.या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे, असे सामंत यांनी सांगितले. याबाबतची माहीती राष्ट्रवादीचे पदाधिकारी भास्कर परब यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा