You are currently viewing गाबीत फिशरमेन फेडरेशन च्या मालवण अध्यक्षपदी श्री विकी चोपडेकर यांची एकमताने निवड

गाबीत फिशरमेन फेडरेशन च्या मालवण अध्यक्षपदी श्री विकी चोपडेकर यांची एकमताने निवड

गाबीत फिशरमेन फेडरेशन च्या मालवण अध्यक्षपदी श्री विकी चोपडेकर यांची एकमताने निवड

मालवण

गाबीत समाजाच्या सहकार, सामाजिक, आर्थिक समस्यांना सोडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गाबीत फिशरमेन फेडरेशन च्या मालवण अध्यक्षपदी श्री विकी चोपडेकर यांची एकमताने निवड करण्यात आली

गाबीत फिशरमेन फेडरेशन ची सभा हॉटेल श्री महाराज मालवण संपन्न झाली यावेळी माजी नगराध्यक्ष व गाबीत समाज वेंगुर्ला अध्यक्ष श्री दिलीप गिरप , देवबाग सरपंच श्री उल्हास तांडेल , पत्रकार श्री विष्णू धावडे , गाबीत समाज जिल्हा संघटक व महिला संस्था अध्यक्ष सौ स्नेहा केरकर , तारकर्ली ग्रा पं सदस्य श्री जितेंद्र केरकर टीटीडिएस अध्यक्ष श्री सहदेव साळगावकर माजी नगरसेविका सौ पूजा सरकारे श्री वसंत तांडेल,श्री सहदेव बापर्डेकर , मालवण मच्छिमार सहकारी संस्था अध्यक्ष श्री विकी चोपडेकर श्री सुरेश बापर्डेकर ,पर्यटन महासंघ मालवण महिला अध्यक्ष मेघा गावकर श्री सुधीर कांदळगावकर , श्री गंगाराम आडकर श्री रुपेश प्रभू ,श्री मनोज खोबरेकर, श्री बाबी जोगी,श्री सचिन गोवेकर श्री प्रेमानंद चोडणेकर श्री प्रसाद मेहता श्री प्रेमानंद चोडणेकर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबीत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गाबीत फिशरमेन फेडरेशनचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी गाबीत समाजासाठी केंद्र व राज्य सरकारच्या शासनाच्या अनेक आर्थिक योजनांमध्ये गाबीत समाजावर होणारा अन्याय दरवर्षी मच्छिमार बंदरे ,बंधारे योजनेसाठी मंजूर झालेला अखर्चित राहाणारा निधी , तसेच प्रामुख्याने गाबीत समाजाच्या जात पडताळणी प्रश्न अश्या अनेक विषयावर गाबीत फिशरमेन फेडरेशन कार्य करणार असून स्थानिक प्रशासन राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी कार्य केले जाणार आहे तसेच गाबीत समाजाच्या या समस्या सोडविण्यासाठी समाजाच्या अनेक संघटना सोबत घेऊन संघटीत पणे काम करण्याची भूमिका मांडली तसेच लवकरच सर्वांच्या सहमतीने फेडरेशन ची जिल्हा कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे सांगितले तर मालवण तालुका नूतन अध्यक्ष म्हणून श्री विकी चोपडेकर यांनी येणाऱ्या काळात टॉलर व्यावसायिकांच्या न्याय हक्कासाठी तसेच मच्छिमार समाजाच्या प्रश्न सोडविण्यासाठी गाबीत फिशरमेन फेडरेशन च्या माध्यमातून प्रयत्न करणार असून अनेक वर्ष प्रलंबित प्रश्नाला वाचा फोडून प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी कार्य करणार असल्याचे सांगितले

यावेळी झालेल्या सभेत गाबीत समाजाच्या प्रश्नाबाबत साधक बाधक चर्चा करण्यात आली

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =