You are currently viewing भाजयुमो आयोजित ” नमो चषक ” अंतर्गत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत मुकुंद तळेकर विजेता

भाजयुमो आयोजित ” नमो चषक ” अंतर्गत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत मुकुंद तळेकर विजेता

*भाजयुमो आयोजित ” नमो चषक ” अंतर्गत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत मुकुंद तळेकर विजेता*

वेंगुर्ले

नमो चषक जिल्हास्तरीय बॕडमिंटन स्पर्धा वेंगुर्ले येथील नगरपरिषद पॅव्हेलीयन हाॅल मध्ये दि. १७ व १८ जानेवारी रोजी उस्फुर्त प्रतिसादात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, विधानसभा क्रिडा आघाडी प्रमुख निशू तोरसकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष राजन गिरप, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, चिफ रेफ्री रविंद्र प्रभूदेसाई आदी उपस्थित होते. तर या स्पर्धेचा बक्षिस समारंभ भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई व माजी नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विधानसभा संयोजक हेमंत गावडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भुषण आंगचेकर, युवा शहराध्यक्ष प्रणव वायंगणकर, भाजपा सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, रविंद्र प्रभुदेसाई, नंदकुमार प्रभुदेसाई, उमेश नाटेकर, हमिद शेख, श्रीकांत सामंत आदी उपस्थित होते. स्पर्धेत एकूण ८९ स्पर्धकांनी भाग घेतला.
*नमो चषक जिल्हास्तरीय बॕडमिंटन स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे*
*पुरुष एकेरी प्रथम* क्रमांक मुकुंद तळेकर .
*पुरुष एकेरी द्वितीय* क्रमांक स्वप्निल सावंत
*पुरुष दुहेरी प्रथम* क्रमांक निखील गवळी व अथर्व पोरे
*पुरुष दुहेरी द्वितीय* क्रमांक अनमोल गिरप व ऋषिकेश रेडकर
*महिला एकेरी प्रथम* क्रमांक सुफीया शेख
*महिला एकेरी द्वितीय* क्रमांक श्रेया सामंत
*महिला दुहेरी प्रथम* क्रमांक सुफिया शेख व गौराई खवणेकर
*महिला दुहेरी द्वितीय* क्रमांक सबा शेख व तबस्यूम शेख. यातील विजेते व उपविजेते यांना खालीलप्रमाणे बक्षिसे देण्यात आली.
पुरुष व महिला एकेरी साठी विजेते यांना ३००० व ट्रॉफी तर उपविजेते यांना २००० व ट्रॉफी. पुरुष व महिला दुहेरी साठी विजेते यांना ४००० व प्रत्येकी एक ट्रॉफी तर उपविजेते यांना ३००० व प्रत्येकी एक ट्रॉफी. माजी आमदार राजन तेली व युवा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी सर्व विजेते, उपविजेते यांचे अभिनंदन केले. या स्पर्धे साठी रेफ्री म्हणून रविंद्र प्रभुदेसाई, केतन आजगांवकर, अजित धारगळकर, नंदकुमार प्रभुदेसाई यांनी काम पाहिले.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

भाजयुमो आयोजित नमो चषक अंतर्गत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , नगराध्यक्ष राजन गिरप , केतन आजगांवकर , हेमंत गावडे , भुषण आंगचेकर , प्रणव वायंगणकर .

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा