You are currently viewing इंडियन स्वच्छता लिग 2.0 सागरी किनारा स्वच्छता मोहीमेत मालवण नेव्हीगेटर्स संघाची दमदार सुरुवात 

इंडियन स्वच्छता लिग 2.0 सागरी किनारा स्वच्छता मोहीमेत मालवण नेव्हीगेटर्स संघाची दमदार सुरुवात 

मालवण:

नगरपरिषदेच्या स्वछता मोहीमेला नागरिक,विद्यार्थी वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद स्वच्छ मालवण शहरासाठी नगरपरिषदेने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर 2023 दरम्यान ‘स्वच्छता पंधरवडा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. मालवण शहराला चिवला ते दांडीपर्यंत सुमारे ८ कि. मी.लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. शालेय विद्यार्थी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, विविध सेवाभावी संस्था आणि मच्छिमार बांधवांच्या सहभागातून शहरातील ठिकठिकाणचे समुद्रकिनारे चकाचक करण्यात आले.

शहरातील राजकोट, दांडी,आवार, मालवण बंदर समुद्रकिनाऱ्यापर्यंत युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी मा. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग श्री. किशोर तावडे (भाप्रसे), प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. संतोष जिरगे, पोलिस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे, सुभेदार मेजर गेडाम, आर्मी आफीसर श्री मंहिदर लाल व श्री शिवशंकर, नायब तहसीलदार श्री गंगाराम कोकरे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

तसेच मस्त्यविभाग अधिकारी श्रीमती तेजस्वीता करंगुटकर, मेरी टाईम बोर्ड कर्मचारी, विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी, मालवण नगरपरिषद नोडल ऑफीसर व बांधकाम अभियंता श्रीमती सोनाली हळदणकर, मुख्य लिपिक महेश परब, लेखापाल श्री. दिनेश राऊत, बांधकाम पर्यवेक्षक श्री सुधाकर पाटकर, लेखा लिपीक आनंद म्हापणकर, आरोग्य लिपिक मंदार केळुसकर, ,नगरपालिकेचे शहर समन्वयक अनिकेत चव्हाण, विदयुत विभाग प्रमुख श्रीमती रसिका कुलकर्णी व अन्य सर्व कर्मचारी वृंद, स.का.पाटील महाविदयालयाचे NCC व NSS चे विदयर्थी/ विदयर्थीनी, रोझरी न्यू इग्लिंश मिडीयम स्कूलचे विदयर्थी/ विदयर्थीनी व शिक्षक वृंद, मालवण माजी नगरसेवक दिपक पाटकर, मंदार केणी, सामाजिक राजकीय कार्यकर्ते श्री सौरभ ताम्हणकर, श्री प्रतिक कुबल, पारंपारिक मच्छिमार, मातृत्व आधार फाउंडेशन, आभाळ माया ग्रुप, स्वराज्य ग्रुप, हॉटेल अतिथी बांबु टिम, युथ बिटस फॉर क्लायमेट, रोटरी क्लब, लायन्स क्लब, आदी सेवाभावी संस्था व महिला बचत गट इंडियन स्वच्छता लिग 2.0 सागरी किनारा स्वच्छता मोहीमेसाठी मालवण बंदर जेटी येथे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमांची सुरुवात ढोल ताशांच्या गजरात सकाळी 7.00 वाजता मा. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग श्री. किशोर तावडे (भाप्रसे) यांच्या स्वागतांने झाली. इंडियन स्वच्छता लिग 2.0 चे मालवण नेव्हीगेटर्सचे संघनायक लेप्ट. डॉ. एम. आर. खोत, स्वच्छतेचे राजदूत डॉ. राहूल वालावलकर, श्री. रुजारियो पिंटो, श्री. संजय गावडे, कु. मेघल डिसोजा व श्री महेंद्र पराडकर यांचे स्वागत व सन्मान मा. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग श्री. किशोर तावडे (भाप्रसे) यांच्या हस्ते संपन्न झाले.

तद्नंतर नगरपरिषद कर्मचा-यांकडून राज्यगीत सादरीकरणाने कार्यक्रमास वंदना देण्यात आली. “मेरी माटी मेरा देश” या केंद्र शासनाच्या अभियानाअंतर्गत प्रंचप्रण शपथ उपस्थित सर्व मान्यवर व नागरीक, विदयार्थी यांच्या समवेत घेऊन भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प घेण्यात आला.

इंडियन स्वच्छता लिग 2.0 सागरी किनारा स्वच्छता मोहिमे केवळ स्वच्छतेपुर्तीच मर्यादित न ठेवता नगरपालिकेने नियोजनबध्द विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये “योग ज्योती मालवण” महिलांचा आगळा वेगळा योगा कार्यक्रम, नगरपरिषद कर्मचारी यांचे मार्फत “सप्तसूर स्वच्छतेचे” पथनाटय, कलांकूर ग्रुप यांच्यामार्फत “हम होंगे कामयाब” फ्लॅश मॉब इत्यादी विविध स्वच्छतेचे संदेश देणारे कार्यक्रम पार पडले.

“माझी माती माझा देश” अभियानातील अमृत कलश यात्रेत मालवण शहरातील विविध प्रभागातील पवित्र माती गोळा करण्यात आलेली होती. सदर अमृत कलशामध्ये मा. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग श्री. किशोर तावडे (भाप्रसे) यांनी मालवण बंदर जेटी येथील माती अर्पण केली तसेच अन्य उपस्थित मान्यवरांनी देखील अमृत कलशामध्ये माती अर्पण करुन सदरच्या उपक्रमाची शोभा वाढविली.

वरील उपक्रमानंतर प्रत्यक्ष सकाळी 8.10 च्या सुमारास सागरी स्वचछता मोहिमेला सुरुवात झाली. सागरी किनारा स्वच्छता मोहिमेमध्ये वेगवेगळया टिम मध्ये मेढा- राजकोट, मच्छीमार्केट पर्यंतचा किनारा स्वच्छ करण्यात आला. या सागरी स्वच्छता मोहिमेध्ये सुमारे 1500 कि.ग्रॅ. (1.5 टन) कचरा गोळा करण्यात आला. अशा प्रकारे मोठया प्रमाणात लोक सहभागातून सदरची स्वच्छता मोहीम यशस्वीपणे पार पडली.

मोहीमे सहभागी झालेल्या सर्वांना अल्पोपहारची व्यवस्था नगरपरिषदेकडून करण्यात आलेली होती. कार्यक्रमांच्या उत्तरार्ध्यात मा. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग श्री. किशोर तावडे (भाप्रसे) यांच्या शुभहस्ते सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण केलेल्या विविध ग्रुप्सना सहभाग प्रमाणपत्र वाटप करण्यात आली.

अशा प्रकारे मालवण नगरपरिषदेच्या वतीने इंडियन स्वच्छता लिग 2.0 सागरी किनारा स्वच्छता मोहिम कार्यक्रम नियोजनबध्द व शिस्तबध्द पध्दतीने पारपाडण्यात आला याबद्दल मा. प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे यांनी मा. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग श्री. किशोर तावडे (भाप्रसे) व अन्य सर्व मान्यवरांचे आभार मानले.

इंडियन स्वच्छता लिग 2.0 सागरी किनारा स्वच्छता मोहीम कार्यक्रमाची सांगता स.का.पाटील महाविदयालयाच्या NCC विदयार्थ्यांमार्फत NCC गीताने झाली. अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा