You are currently viewing नेट नसल्याने मुलांना ऑनलाईन अभ्यास करतांना येतोय व्यत्यय
बी एस एन एल नेटवर्कचा खेळखंडोबा थांबवा - लखु खरवत

नेट नसल्याने मुलांना ऑनलाईन अभ्यास करतांना येतोय व्यत्यय

करूळ गावात नवीन मोबाईल टॉवर बांधून मोबाईल नेटचा प्रश्न मार्गी लावावा – करूळ ग्रामस्थ

वैभववाडी

​वैभववाडी तालुक्यातील करूळ हा गाव सहयाद्रीच्या कुशीत वसलेला आहे. या गावासाठी कोल्हापूर – गगनबावडा येथील बीएसएनएल कंपनीचा मोबाईल टॉवर वरून नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे करूळ गावातील सहा वाडीतील जनतेला याचा त्रास सहन करावा लागत आहे. करूळ गावांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथील करूळ व अन्य तालुक्यातील गावातील जनतेला बीएसएनएल कंपनीच्या टॉवर वरून नेटवर्क मिळत आहे. गेली अनेक वर्षे या टॉवर वरून कधी नेट मिळते तर कधी नेट गायब झालेले असते.सध्या करूळ गावातील सुमारे ​१,५०० लोक बीएसएनएल मोबाईलचा वापर करत आहेत.​ ​दर महिना प्रत्येक व्यक्ती ​२०० रुपये प्रमाणे नेट पॅक रिचार्ज करत आहेत.​ ​सुमारे ​३० हजार रुपये गावातून दर महिना कंपनीला मिळत आहेत.​ ​त्यामुळे कंपनी कडून जनतेला दर्जेदार सेवा मिळावी ही अपेक्षा आहे.​ ​कोविड​ – ​१९ मुळे सध्या करूळ गावामध्ये मुंबई व अन्य जिल्ह्यातून शेकडो चाकरमानी आलेले आहेत.​ ​​त्यांची मुले व स्थानिक ​लोकांच्या शाळेतील मुलांना ऑनलाईन अभ्यास दिला जातो. मात्र बरेच वेळा नेट नसल्याने मुलांना ऑनलाईन अभ्यास करतांना व्यत्यय येत असतो.त्याच प्रमाणे शिक्षकांशी संवाद साधतांना अनेक अडचणी येत आहेत.तसेच काही वेळा वयोवृद्ध व्यक्ती आजारी पडली तर रिक्षा व अन्य खाजगी वाहन बोलावण्यासाठी अनेक वेळा वाहन चालकाशी संपर्क होत नाही. अशा अनेक समस्या येत आहेत प्रसंगी आजारी व्यक्ती दगावण्याची शक्यता असते.

करूळ भट्टीवाडी येथे मोबाईलसाठी एखाद्या कंपनीचा टॉवर व्हावा म्हणून स्थानिक ग्रामस्थ करारावर जमीन कंपनीला देण्यासाठी तयार आहेत. सध्या करूळ गावातील भट्टीवाडी, दिंडवणे,​ ​खडकवाडी,​ ​गावठाणवाडी अ,​ ​गावठाणवाडी ब,​ ​डोनावाडी,​ ​केगदवाडी या सहा वाडयांना बीएसएनएल कंपनीचे नेट वर्क पावसाळ्यात मिळत नाही. या बाबत करूळ गावातील लोकांनी गगनबावडा येथील बीएसएनएल कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता दर वेळी वेगवेगळ्या समस्या येत असल्याचे सांगत आहेत. करूळ गावात नवीन मोबाईल टॉवर बांधून मोबाईल नेटचा प्रश्न मार्गी लावावा असे करुळ ग्रामस्थ व मुंबईतील ​चाकरमान्यांची मागणी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + seven =