You are currently viewing भुताखेतांच्या कथा

भुताखेतांच्या कथा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे ची लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम कथा*

 

*भुताखेतांच्या कथा* 

*( भाग १९ वा..)*

 

बरेच वर्षापुर्वीची सत्य घटना आहे . मी माझ्या मित्राच्या मुलाच्या लग्नासाठी दक्षिण महाराष्ट्रातील एका पंचतारांकित हॉटेल मध्येच उतरलो होतो. त्याच हॉटेलमध्ये लग्न सोहळा होता. हॉटेलच्या सर्वच रूमस मद्धये लग्नाची वर्हाडी मंडळी उतरली होती. मुक्काम होता . अगदी प्रसन्न वातावरण होते. पंचतारांकित हॉटेल असल्यामुळे सर्व सोयी उत्तम होत्या. प्रत्येक कपलला स्वतंत्र रूम दीली होती . संध्याकाळी श्रीमंत पूजनाचा विधी झाला , सुग्रास पंचपक्वानाचे जेवण झाले .

सकाळी लग्न असल्यामुळे सर्वजण आपआपल्या रूममद्धये झोपण्यासाठी गेले ..सकाळी आवरायचे म्हणून मी बाथरूम मद्धये गेलो स्नानही झाले .. तेंव्हा समोरच्या आरश्यामध्ये मी केस विंचरावेत म्हणून पाहिले तर तिथे आरश्याच्या वरील बाजूस जी खिड़की होती त्या खिडकीच्या गजाला धरुन एक मध्यमवयीन विचित्र व्यक्ती दात विस्फारुन माझ्याकड़े डोकावून पहात होती . मी कोण आहे म्हणून जोरात ओरडताच ती व्यक्ती एका क्षणात दिसेनाशी झाली. मी तसाच टॉवेलवरच होटेलच्या मैनेजर कड़े गेलो . त्याला ही घडलेली घटना सांगितली . तो म्हणाला हे शक्यच नाही . कारण तिथे कुणी येणेच शक्य नाही. मी त्याला बाथरूममद्धये घेवून आलो .बाथरूम मधील घडलेली घटना ते खिडकीचे गज दाखविले . तेंव्हा तो मैनेजर म्हणाला ही रूम चौथ्या मजलावर आहे . बर ही रूम रोडफेसिंग आहे ..इकडे कुणी चढून येण्याची सुतराम शक्यताही नाही . पण ही घटना माझ्यासोबत घडली होती . मी ,,,लगेचच हॉटेलच्या खाली जावूनही पहिले तेंव्हा खालून कुठलाही आधार घेवून वर चौथ्या मजल्यापर्यन्त कुणी चढु शकणार नाही याची मला खात्री झाली .

*तुम्हाला काही भास झाला असेल. असे होटेल मॅनेजरने मला सांगीतले .*

पण मला मात्र १००% टक्के त्याठिकाणी कुणीतरी व्यक्ती पहिल्याचे आज ही स्मरते आहे . ही सत्य घटना आहे..

दूसरी गोष्ट अशीच माथेरानला पिकनिकसाठी गेलो होतो तेंव्हा घडली होती , रात्री रूममध्ये झोपल्या नंतर रूम मध्ये काही सावल्यांचे भास , विचित्र भीतिदायक ओरडण्याचे किंचाळण्याचे आवाज येत होते हे खरे , मी रूमच्या दोन्ही बाजूच्या खिडक्या उघडून पाहिले तिथेही कुणी व्यक्ती किंवा कुणा वाचमनचा वावर मला दिसला नाही. किर्रर्र रात्र होती .

हॉटेलमध्ये देखील रात्रीचा एक वाजून गेला असल्यामुळे शांतता होती. मी पत्नीला आपण एक रात्र इथे काढूया असे मी पत्नीला सांगीतले पण तीची एक क्षणही थांबण्याची मानसिक तयारी नव्हती , इतकी ती घाबरलेली होती . तेंव्हा रात्रीच २ वाजताच कुठलीही चर्चा न करता त्या हॉटेलमधील रूम सोडली रुम सर्वंट कडून आमच्या बॅगा आमच्या गाडीत टाकल्या आणि तिथून रात्रीच दुसऱ्या हॉटेलमध्ये मुक्कामासाठी गेल्याचं आठवते आहे . असे अनुभव हे सर्वांनाच येत असतास. मला तर असे अनुभव आलेत हे मात्र खरं ..!

भूतपिशाच्य योनी आहे की नाही हा समाजात संभ्रम आहे . ते सहाजिक आहे ..पण हे मी स्वतः अनुभवले आहे …..

असे अनेक शापित वास्तु असतात. त्या वास्तुत अतृप्त आत्मा ( पिशाच्य योनी असु शकते ) असे अनेक वास्तु आजही आहेत .. अशा भकास वास्तुबद्दल पुढील भाग क्रमांक २० मद्धये लिहीत आहे.

 

*©वि.ग.सातपुते. (विगसा ).*

( 9766544908 )

〰〰〰〰〰〰〰〰

 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × one =