You are currently viewing सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयातील वाहन कर घोटाळाप्रकरणी पाच कर्मचारी निलंबित…

सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयातील वाहन कर घोटाळाप्रकरणी पाच कर्मचारी निलंबित…

आ. वैभव नाईक यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे तक्रार करत संबंधितांवर कारवाईची केली होती मागणी

सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयातील वाहन कर घोटाळाप्रकरणी पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे स्वप्निल मुंडेकुळे श्रावणी मयेकर सिद्धेश्वर घुले ,समदळे व माने या पाच लिपिक कर्मचाऱ्याना निलंबित करण्यात आले आहे.
वाहनांची नोंदणी करण्यात आली. मात्र वाहन करच भरला नव्हता. २०१८ पासून गेल्या दोन वर्षात सुमारे १०० वाहनांचा कर न भरता कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला होता. याबाबत पोलीस खात्यामार्फत व आरटीओ कार्यालय खात्यांतर्गत चौकशी होऊन वाहन कर घोट्याळ्यात प्रथमदर्शनी कसूर केल्याचे आढलेल्या पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परीवहन कार्यालयामार्फत वाहन रजिस्ट्रेशन व आकर्षक नंबरप्लेट चे काम करून देणाऱ्या खाजगी व्यक्तीकडून बनावट खोटे वाहन परवाने देऊन रजिस्ट्रेशनची व आकर्षक नंबरची रक्कम स्वीकारली गेली मात्र त्यात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते.
याबाबत आमदार वैभव नाईक यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे तक्रार करून वाहन कर घोटाळ्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मागील महिन्यात परिवहन मंत्र्यांच्या दालनात बैठक झाली त्यावेळी ना. अनिल परब यांनी वाहन कर घोटाळ्यातील जे अधिकारी दोषी आहेत त्यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. सोमवारी आमदार वैभव नाईक यांनी पुन्हा ना.अनिल परब यांची भेट घेऊन याबाबत विचारणा केली होती.त्यानुसार सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयातील वाहन कर घोटाळाप्रकरणी पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 3 =